जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Traffic Rules : चालकाने रस्त्यावर असं काही केलं की वाहतूक पोलिसाने ठोठावला 1 कोटीचा दंड

Traffic Rules : चालकाने रस्त्यावर असं काही केलं की वाहतूक पोलिसाने ठोठावला 1 कोटीचा दंड

वाहतूक पोलिसाने ठोठावला 1 कोटीचा दंड

वाहतूक पोलिसाने ठोठावला 1 कोटीचा दंड

One Crore fine for breaking traffic rules : एका ड्रायव्हरने असं कृत्य केलं की तिथल्या पोलिसांनी त्याला 1 कोटीचा दंड ठोठावला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 07 जून : रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी नियम करण्यात आले आहेत. जर कोणी हे नियम मोडले तर त्याला शिक्षा होते. याला वाहतूक नियम म्हणतात. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये वाहतुकीचे नियम वेगवेगळे आहेत. युरोपमधील फिनलँडमधून ट्रॅफिकचे नियम मोडल्याची घटना समोर आली आहे, जिथे एका ड्रायव्हरने असं कृत्य केलं की तिथल्या पोलिसांनी त्याला 1 कोटीचा दंड ठोठावला. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना युरोपमधील फिनलँडची आहे. अँडर्स विक्लॉफ असं चालान कापण्यात आलेल्या चालकाचं नाव आहे. तो बराच जुना ड्रायव्हर असूनही तो ओव्हरस्पीडिंग करत असल्याचं दिसून आलं. ज्या ठिकाणी तो ओव्हरस्पीड करत होता तिथे कार स्पीडची कमाल मर्यादा 50 किलोमीटर प्रतितास आहे, पण तो ताशी 82 किलोमीटर वेगाने गाडी चालवत असल्याचं सांगण्यात आलं. Viral Video : ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या बस ड्रायव्हरने बसमध्येच सुरु केलं हे काम मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही नमूद केलं आहे, की पोलिसांनी त्याला 1.3 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे एक कोटी रुपयांचं चालन जारी केलं आहे आणि दहा दिवसांसाठी त्याचा परवाना देखील निलंबित केला आहे. ओव्हरस्पीडिंग करताना या व्यक्तीला पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही, असंही सांगण्यात आलं. त्याला वेगात गाडी चालवण्याची सवयच लागलेली दिसते. याआधीही त्याला जास्त ओव्हरस्पीडिंग केल्याबद्दल मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. फिनलँड हा एक असा देश आहे जिथे वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. एक मनोरंजक गोष्ट म्हणजे फिनलँडमध्ये, दंडाची रक्कम गुन्हेगाराच्या उत्पन्नाच्या आधारावर आकारली जाते. ज्याचं उत्पन्न जितकं असेल त्याचे दोन भाग केले जातील आणि त्यानंतर जो आकडा येईल, त्या व्यक्तीला तेवढाच रुपये दंड आकारला जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात