जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या बस ड्रायव्हरने बसमध्येच सुरु केलं हे काम

Viral Video : ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या बस ड्रायव्हरने बसमध्येच सुरु केलं हे काम

ट्रॅफिक जॅम व्हिडीओ

ट्रॅफिक जॅम व्हिडीओ

दैनंदिन जीवनात सर्वच लोक कामानिमित्त बाहेर पडताना दिसतात. त्यामुळे रस्त्यावर आलं की मोठ्या संख्येनं ट्रॅफिक पहायला मिळतं. रोजच्या या ट्रॅफिकला लोक कंटाळले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 मे : दैनंदिन जीवनात सर्वच लोक कामानिमित्त बाहेर पडताना दिसतात. त्यामुळे रस्त्यावर आलं की मोठ्या संख्येनं ट्रॅफिक पहायला मिळतं. रोजच्या या ट्रॅफिकला लोक कंटाळले आहेत. अनेकजण या ट्रॅफिकमध्ये वाईटरित्या अडकतात. सोशल मीडियावर असे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांचे अनेक व्हिडीओ समोर येतात. तासनतास अडकलेल्या या ट्रॅफिकमध्ये लोक वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसून येतात. याचे अनेक मजेशीर, विचित्र, भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या आणखी एक ट्रॅफिकमधील व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक बस चालक ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याने त्याचे जेवण करताना दिसत आहे. ज्यावरून असा अंदाज लावता येतो की, ट्रॅफिकमुळे अडकून पडल्यानंतरही त्या वेळेचा योग्य वापर कसा करायचा हे लोकांना कळायला हवे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ बंगळूरुमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ साईचंद बय्यावरपू नावाच्या व्यक्तीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ 16 लाख वेळा पाहिला गेला आहे आणि एक लाख 86 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी तो लाईक केला आहे.

जाहिरात

दरम्यान, बेंगळुरूचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहेत. ज्यामध्ये तिथे होणाऱ्या ट्रॅफिक जाममुळे लोक हैराण होताना दिसत आहेत. बर्‍याच वेळा हे ट्रॅफिक जॅम इतके लांब असतात की लोक त्यांची फ्लाइट आणि अनेक महत्त्वाच्या मीटिंग चुकवतात. या ट्रॅफिक जॅममुळे काही लोकांना वेळेवर पोहोचता येत नाही. दुसरीकडे, काहींना योग्य वेळी पोहोचण्यासाठी काही तास अगोदर घरातून बाहेर पडावे लागते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात