Home /News /viral /

लॉलिपॉप खाऊन चिमुकलीची झाली भयंकर अवस्था; फोटो पाहून बसेल धक्का

लॉलिपॉप खाऊन चिमुकलीची झाली भयंकर अवस्था; फोटो पाहून बसेल धक्का

महिलेनं निक्कीला आपल्या मुलीचा एक फोटो पाठवला. यात तिच्या लहान मुलीची जीभ बाहेर आलेली होती आणि यावर भयंकर जखमा झाल्या होत्या

    नवी दिल्ली 01 नोव्हेंबर : लॉलिपॉप खाणं प्रत्येक लहान मुलाला आवडतं. प्रत्येक लहान मुलं लॉलिपॉप मिळवण्यासाठी मोठ्यांकडे हट्ट करतं. लोक लहान मुलांना बऱ्याचदा असं सांगतात, की लॉलिपॉप खाल्ल्यानं दात किडतात. मात्र, नुकतंच एका चिमुकलीसोबत लॉलिपॉप खाल्ल्यानं भयंकर घटना घडली. तिची जीभ पूर्णपणे जळाली आहे (Tongue Burnt Due to Lollipop). हे प्रकरण सर्वांनाच हैराण करणारं आहे. झोपाळूंसाठी सुरू झाली विशेष बससेवा, 4 हजार मोजा आणि 5 तास झोपा चाइल्ड सेफ्टी एज्यूकेटर (Child Safety Educator) निक्की जरकट्सनं नुकतंच सोशल मीडियावर एका महिलेची पोस्ट शेअर केली आहे. महिलेनं निक्कीला आपल्या मुलीचा एक फोटो पाठवला. यात तिच्या लहान मुलीची जीभ बाहेर आलेली होती आणि यावर भयंकर जखमा झाल्या होत्या. तिच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. हे पाहून असं वाटत होतं, की तिला भरपूर वेदना होत आहेत. फोटो पाहून निक्की हैराण झाली आणि तिनं ती पोस्ट शेअर केली ज्यात महिलेनं सांगितलं होतं की तिच्या मुलीची अशी अवस्था कशी झाली. महिलेनं आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की तिच्या मुलाकडे अॅसिडिक लॉलिपॉप (Acidic Lollipop) आहे. ज्याची चव अतिशय तिखट आणि आंबट आहे. या चिमुकलीच्या हाती हा लॉलिपॉप लागला, यानंतर तिनं कोणाला न विचारताच तो खाल्ला. मात्र, यानंतर तिचे जीभ वाईट पद्धतीनं जळाली. यानंतर ही चिमुकली पळतच आपल्या आईजवळ आली. तिची जीभ पाहून आईलाही धक्का बसला. जबरदस्त! वयाच्या 16 वर्षी सुरू केलं Saving; 21 येईपर्यंत खरेदी केलं स्वत:च घर या महिलेनं आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या (Social Media Post) माध्यमातून इतरांनाही सावध केलं आहे, की आपल्या मुलांना असे लॉलिपॉप खाऊ देऊ नका. निक्कीदेखील दोन मुलांची आई असून हा फोटो पाहून ती घाबरली. तिनं लोकांना सल्ला दिला की लहान मुलांना अॅसि़डिक लॉलिपॉप नाही खाऊ दिले पाहिजे. मोठ्यांची ही जबाबदारी आहे, की पाच वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना लॉलिपॉप खाऊ देऊ नये. कारण याचा जीभेवर इतका वाईट परिणाम होत आहे, तर पोटावर काय होत असेल.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking news

    पुढील बातम्या