• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • झोपाळूंसाठी सुरू झाली विशेष बससेवा, 4 हजार मोजा आणि 5 तास झोपा

झोपाळूंसाठी सुरू झाली विशेष बससेवा, 4 हजार मोजा आणि 5 तास झोपा

प्रवासात ज्यांना गाढ (A company beging bus for sleep lovers) झोप लागते, त्यांच्यासाठी एक खास सेवा सुरु करण्यात आली आहे. अऩेकांना घरी झोप लागत नाही.

 • Share this:
  हॉंगकाँग, 31 ऑक्टोबर: प्रवासात ज्यांना गाढ (A company beging bus for sleep lovers) झोप लागते, त्यांच्यासाठी एक खास सेवा सुरु करण्यात आली आहे. अऩेकांना घरी झोप लागत नाही. कधी कधी घरी (Quality nap in the bus) अनेक प्रकारचे आवाज येत असल्यामुळे किंवा नवी जागा असल्यामुळे अनेकजण झोपू शकत नाही. मात्र त्यातील अनेकांना प्रवास सुरू झाला की डुलकी यायला सुरुवात होते. प्रवासात झोपण्याची आवड असलेल्यांसाठी (Travel company begins bus for taking naps) एका ट्रॅव्हल कंपनीनं खास सेवा सुरु केली आहे. अशी आहे संकल्पना हाँगकाँगमधील उलू ट्रॅव्हल्स (ULU TRAVELS) या कंपनीनं झोपाळूंसाठी एक खास बस तयार केली आहे. अनेकांना प्रवासात जितकी चांगली झोप येते, तितकी इतर कुठेच येत नाही. मात्र प्रवासात झोपण्याची आवड असलेल्या प्रत्येकाला नियमित प्रवास करण्याची संधी मिळतेच, असं नाही. अशा प्रवाशांसाठी एक खास बससेवा सुरू करण्यात आली आहे. अशी आहे योजना हॉंगकाँगमध्ये सुरू झालेली ही बस खास झोपाळूंसाठी तयार कऱण्यात आली आहे. या बसमध्ये बसण्याची सोय आहे, झोपण्याची नाही. बसून खिडकीतून बाहेर पाहत डुलकी काढण्याची सोय यात करण्यात आली आहे. ही बस एका फेरीत 45 किलोमीटर फिरून येते आणि त्यासाठी 5 तास लागतात. ज्यांना झोपण्याची इच्छा आहे, ते तब्बल 5 तासांची मनसोक्त डुलकी या बसमध्ये काढू शकतात. हे वाचा- बाहुल्यांशी खेळण्याच्या वयात ती झाली आई, लोकांना वाटतं हा मुलगा नव्हे भाऊच! हॉटेलपासून होते सुरुवात प्रवास सुरु होण्याअगोदर ही बस एका हॉटेलपाशी थांबते. तिथं बसमधील प्रवासी भरपेट जेवण करतात, जेणेकरून चांगली झोप यावी. त्यानंतर ही बस कमी वेगाने चालत राहते. पाच तासांच्या प्रवाासानंतर ज्या ठिकाणाहून प्रवास सुरू झाला होता, त्याच ठिकाणी ती येऊन थांबते. या बसमध्ये चार वेगवेगळे क्लास आहेत. तिथे असणारी शांतता आणि सुखसोयी यावरून हे दर ठऱतात. मात्र साधारणपणे एका फेरीसाठी 4 ते 5 हजार रुपये घेतले जातात.
  Published by:desk news
  First published: