• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • जबरदस्त! वयाच्या 16 वर्षी सुरू केलं Saving; 21 येईपर्यंत खरेदी केलं स्वत:च घर

जबरदस्त! वयाच्या 16 वर्षी सुरू केलं Saving; 21 येईपर्यंत खरेदी केलं स्वत:च घर

Saving चं हे साधं सोपं ट्रिक वापरून या मुलीने अवघ्या 6 वर्षांत घर खरेदी केलं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : सध्याच्या काळात श्रीमंत व्यक्ती ती नाही जी लाखो रुपये कमावते, तर ती आहे जी योग्य पद्धतीने पैशांची सेविंग करते. सेविंग (Saving Money) म्हणजे बचत करणं प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यकत असते. यामुळे विनाकारण होणाऱ्या खर्चाच्या भावनेपासून सुटका होऊ शकते. अनेकांना असं वाटतं की, कमी वयात  (Saving Money in Young Age) बचक करणं मुर्खपणाचं आहे. हे वय मजा करण्याचं असं, त्यात बचत करण्याची गरज नसल्याचं म्हटलं जातं. हाच विचार 21 वर्षी तरुणीने खोटा ठरवला आहे. तिने कमी वयात आपलं स्वत:च घर (Woman Bought House at 21) खरेदी केलं आहे. द सन वेबसाइटच्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये (England) राहणारी बेका थॉम्प्सन (Becca Thompson) हिने नुकतच आपल्या टिकटॉक अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने सांगितलं की, 16 व्या वयात तिने (Girl Started Saving from 16 years) सेविंग सुरू केलं आणि 21 व्या वर्षी स्वत:च घर खरेदी केलं. हा व्हिडीओ जलद गतीने व्हायरल होत आहे. हे वाचून तुम्ही हैराण व्हाल की, कमी वयात तिने कशा प्रकारे प्रॉपर्टी खरेगी केली. बेकाने सांगितलं की, सुरुवातीला तिचा पगार खूप कमी होता. ती एका तासाला 307 रुपये अशा हिशोबाने कमावित होती. तिने 5 वर्षांपर्यंत नियमित सेविंग केलं होतं. हे ही वाचा-बँकेत शुन्य बॅलेन्स असतानाही काढू शकणार पैसे, काय आहे प्रोसेस? बेकाने टायनी आणि वीयर Tyne and Wear मध्ये 2 बेडरूमचा फ्लॅट खरेदी केलं. जो कोरोनामुळे 88 लाख रुपयांत मिळाला होता. बेकाने आपल्या सेविंग ट्रिक सांगताना म्हणाली की, जेव्हा मी जितके पैसे खर्च करीत होती, तितकेच पैसे सेविंग अकाऊंटमध्ये टाकत होती. यामुळे असं झालं की, मला जेव्हा असं वाटायचं की मी एखादी गोष्टी दोनदा खरेदी करू, मात्र मला ते शक्य होत नव्हतं. यानंतर मी निर्णय घेतला की मी आता घर खरेदी करेन. त्यानंतर मी प्रत्येक महिन्याला 82 हजार रुपये वाचवणं सुरू केलं. बेका पुढे म्हणाली की, तिचा सेविंगचा एकमेव आणि अत्यंत सोपा नियम आहे की, जितके पैसे खर्च कराल तितके सेव्ह करा. बेकाचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे आणि तिचं कौतुकही होत आहे. सुरुवातीच्या काळात बेकाचे आई-बाबा तिच्याकडून पैसे मागत नव्हते. शिवाय खर्च तिने कमीच केला होता. ज्यानंतर हळू हळू पगार वाढला तर तिने सेविंग देखील वाढवली.

  Published by:Meenal Gangurde
  First published: