VIDEO : आग लागलेल्या इमारतीवरून खाली पडला 3 वर्षांचा चिमुरडा, हिरोसारखा आला तरूण आणि...

VIDEO : आग लागलेल्या इमारतीवरून खाली पडला 3 वर्षांचा चिमुरडा, हिरोसारखा आला तरूण आणि...

हृदयाचे ठोके चूकवणारा हा VIDEO, पाहा तरुणानं कसे वाचवले तीन वर्षांच्या चिमुरड्याने प्राण.

  • Share this:

फीनिक्स, 09 जुलै : असं म्हणतात की देव कोणत्याही रुपात आपल्या मदतीला येतो. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील अ‍ॅरिझोना राज्यातील फीनिक्स या शहरात घडला. येथील एका इमारतीला आग लागली. आग लागल्यावर घाबरून आईनं आपल्या तीन वर्षांच्या लेकाला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. लेकरू खाली पडणार तेवढ्यात एक तरुणानं त्या मुलाला वाचवले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चिमुरड्याचे प्राण वाचवणाऱ्या मुलाचे कौतुक केले जात आहे.

28 वर्षीय फिलीप ब्लॅक्सनं एका इमारतीच्या घराला आग लागल्याचे पाहिले. तिसऱ्या मजल्यावर एका महिला आपल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याला दिसले. संपूर्ण घराला आग लागल्यामुळं त्यांना बाहेर काढण्यासाठी त्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकण्याशिवाय महिलेकडे पर्याय नव्हता. तेवढ्यातच फिलीप तेथे आला आणि त्यानं या चिमुरड्याचे प्राण वाचवले.

वाचा-भयानक! कार चालवताना ब्रेकजवळ बसला होता सगळ्यात विषारी साप, पुढे झालं असं...

वाचा-चिमुरड्याच्या अंगावरून गेली कार आणि...श्वास रोखून धरायला लावणार VIDEO

3 वर्षांच्या चिमुरड्याला वाचवण्यात यश आले असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याच्या आईचा आगीत होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, फिलीपनं दाखवलेल्या प्रसंगावधानमुळे त्याचे कौतुकही केले जात आहे. मात्र फिलीपनं एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, या सगळ्यात खरी हिरो या मुलांची आई. तिने स्वत:चा जीव गमावून मुलांना वाचवलं, असे सांगितले.

वाचा-भयंकर! सराव सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

दरम्यान, महिलेच्या घरात आगी कशामुळं लागली याचा तपास सुरू असून प्रत्यक्षदर्शीनी आग मोठ्या प्रमाणावर लागल्याचे सांगितले.

संपादन - प्रियांका गावडे

Published by: Priyanka Gawde
First published: July 10, 2020, 10:50 AM IST

ताज्या बातम्या