• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • भयंकर! सराव सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

भयंकर! सराव सुरू असतानाच फुटबॉलपटूवर कोसळली वीज, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

सराव करत असताना अचानक गडगडाट झाला आणि 16 वर्षीय खेळाडूवर कोसळली वीज, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ.

 • Share this:
  मॉस्को, 07 जुलै : सध्या लॉकडाऊनमुळे सर्व स्पर्धा रद्द झाल्या आहेत. यातच काही देशांनी आता काही प्रमाणात सराव करण्यास खेळाडूंना परवानगी दिली आहे. मात्र सरावा दरम्यान रशियाचा मॉस्कोजवळील (Moscow) ओरेखोवो-झुएवो (Orekhovo-Zuevo) शहराजवळील अशी घटना घडते जी पाहून सर्व हैराण झाले. इथल्या फुटबॉल मैदानावर सराव चालू असताना 16 वर्षांच्या फुटबॉलपटूच्या अंगावर अचानक वीज कोसळली. विजेचा धक्का लागल्यानं हा मुलगा जागीच कोसळला. मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाचा जीव वाचला असला तरी, सध्या तो कोमामध्ये गेला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसर, या मुलाच्या मानेवर वीज कोसळली. त्यामुळं जळल्याची खूनही आली. या 16 वर्षीय खेळाडूचे नाव इव्हान जाबोर्स्की आहे. इव्हान संघात गोलकिपर म्हणून खेळत होता. दरम्यान वीज कोसळली तेव्हा इव्हान पेनल्टी शूट करण्याचा सराव करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, फुटबॉलच्या गेममध्ये गोलकिपर संरक्षणासाठी हेल्मेट घालतात. सराव दरम्यान इव्हानने हे देखील परिधान केले होते, मात्र या धातूच्या हेल्मेटवर वीज कोसळली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,वीज पडल्यानंतरही इव्हान जिवंत आहे हा एक चमत्कार आहे. वाचा-पाहता पाहता नदीत बुडाली माणसांनी भरलेली बोट, थरकाप उडवणारा VIDEO वाचा-भर पावसात सुरू होते पोल दुरुस्तीचे काम,वायरमॅनचा अचानक गेला तोल आणि..,पाहा VIDEO इव्हान फुटबॉल क्लब ज्नाम्याकडून खेळतो आणि तो परिसरातील एक अतिशय प्रसिद्ध खेळाडू आहे. ही घटना घडली तेव्हा ना पाऊस पडला ना हवामान खराब होते, अशा परिस्थितीत अचानक वीज कोसळणे आश्चर्यकारक आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. वाचा-लग्नापेक्षा काम महत्त्वाचं! सप्तपदी सोडून मंडपातच लॅपटॉपवर काम करायला लागली वधू या व्हिडीओमध्ये वीज पडताना दिसत आहे. वीज पडल्यानंतर इव्हान बेशुद्ध पडला, त्याला श्वास घेता येत नव्हता. त्वरित त्याला हेलिकॉप्टरने मॉस्कोमधील रुग्णालयात नेण्यात आले आणि सध्या तो कोमामध्ये आहे. संपादन-प्रियांका गावडे.
  Published by:Manoj Khandekar
  First published: