Home /News /viral /

भयानक! कार चालवताना ब्रेकजवळ बसला होता सगळ्यात विषारी साप, पुढे झालं असं...

भयानक! कार चालवताना ब्रेकजवळ बसला होता सगळ्यात विषारी साप, पुढे झालं असं...

युवकाने सापाला काढून टाकण्याचा प्रयत्न केला असता सापानेच त्याला कडकडून पकडलं होतं.

    नवी दिल्ली, 08 जुलै : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. असाच एक भयानक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार चालवताना एका युवकाला विषारी सापाने चावल्याचा प्रकार ऑस्ट्रेलियामध्ये घडला आहे. इतकंच नाही तर युवकाने सापाला काढून टाकण्याचा प्रयत्न केला असता सापानेच त्याला कडकडून पकडलं होतं. त्यानंतर जे घडलं त्याकडे सगळेच जण बघत बसले. मिळालेल्या माहितीनुसार, सापाने तरुणाला डसल्यानंतर त्याने गाडी थांबवून त्याच्याशी लढण्याचा खूप प्रयत्न केला. पण तोपर्यंत त्या सापाने त्याला जखमी केलं होतं. क्वीन्सलँड पोलिसांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि यासंदर्भात माहिती दिली. जगातील सर्वात विषारी सापाने या युवकावर प्राणघातक हल्ला केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीत शिवभोजन थाळीसंदर्भात राज्य कॅबिनेटचा महत्त्वाचा निर्णय हा साप जगातील सर्वात धोकादायक सापांमध्ये मानला जातो. इतकंच नाही तर या सापाच्या विषामुळे बर्‍याच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एक व्यक्ती 123 किमी प्रतितास वेगानं गाडी चालवत असल्याचं स्थानिक पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी त्याचा पाठलाग केला. जेव्हा ते गाडीजवळ आले तेव्हा त्यांना संपूर्ण परिस्थिती लक्षात आली. त्यांनी तात्काळ युवकाला वैद्यकीय मदत दिली. 'कोरोना फक्त पहिली लहर आहे, दीर्घकाळासाठी जगाल परिणाम भोगावे लागतील', चीनची धमकी खरंतर, कारच्या ब्रेकजवळ साप बसला होता. युवक गाडीत बसला आणि निघाला त्याने ब्रेक दाबण्यासाठी ब्रेकवर पाय ठेवला असता सापाने युवकावर हल्ला केला. सापाचं विष पसरल्यामुळे युवक जखमी झाला आणि त्याच्याकडून गाडीचा वेग वाढल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Trending news

    पुढील बातम्या