जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video Viral: विशालकाय अजगरावर बसला चिमुकला मग जबड्यात हात घातला अन्.., थरकाप उडवणारा घटना

Video Viral: विशालकाय अजगरावर बसला चिमुकला मग जबड्यात हात घातला अन्.., थरकाप उडवणारा घटना

अजगरासोबत खेळताना दिसला चिमुकला

अजगरासोबत खेळताना दिसला चिमुकला

हा मुलगा चक्क अजगरावर बसून त्याची सवारी करताना दिसत आहे. अजगराच्या अंगावर बसून मुलगा निवांतपणे सरकत पुढे सरकत असल्याचं दिसतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 जुलै : जगात असे काही प्राणी आहेत, जे अगदी दूर दिसले तरी त्यांना पाहूनच लोक घाबरतात. साप त्यापैकीच एक. साप लहान असो वा मोठा, त्याला पाहताच लोकांचा थरकाप उडतो. लहान साप त्यांच्या विषाने एखाद्याचा जीव घेतात, तर मोठे साप त्यांच्या भक्ष्याला चिरडून त्याचे तुकडे करतात. अवाढव्य साप दिसायला खूप भयानक असतात. त्यांना पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. अशा स्थितीत लहान मुलांचा प्रश्न तर दूरच. पण आज आम्ही जो व्हिडिओ दाखवणार आहोत तो पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका भलामोठा अजगर आणि एक लहान मुलगा दिसत आहे. हा मुलगा चक्क अजगरावर बसून त्याची सवारी करताना दिसत आहे. अजगराच्या अंगावर बसून मुलगा निवांतपणे सरकत पुढे सरकत असल्याचं दिसतं. पण एवढं करूनही हा मुलगा शांत बसला नाही. तो अजगराच्या अंगावरुन उठला आणि त्याच्या समोर जात हाताने अजगराचा जबडा उघडताना दिसला. इवल्याशा मुलाला या अजगराशी खेळताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

जाहिरात

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचा अजगर दिसत आहे. तो प्रचंड मोठा आहे. या अजगराने ठरवलं तर तो मोठ्या व्यक्तीलाही सहज गिळू शकतो. पण त्याच्याशी खेळणाऱ्या लहान मुलाला त्याने इजाही केली नाही. मुलगा अजगराच्या अंगावर बसलेला दिसला. अजगर पुढे सरकत होता आणि त्यासोबत लहान मुलगाही पुढे जात होता. थोड्या वेळाने मुलगा उठला आणि अजगराच्या तोंडाजवळ गेला. मुलाने हाताने अजगराचं तोंड वर करून त्याचा जबडा उघडला. पण अजगराने काहीच केलं नाही. इवल्याशा पक्षाने वाघाची हवा केली टाईट; जीव वाचवून पळाला प्राणी, Video एकदा बघाच व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा दोन वर्षांचाही नसेल. पण मोठ्या हिंमतीने अजगराशी खेळताना दिसला. हा साप या कुटुंबाने पाळीव प्राणी म्हणून पाळला असल्याचं सांगण्यात येत आहे. पण साप हा साप असतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी मुलाबद्दल चिंता व्यक्त केली. लोकांनी कमेंट करत मुलाच्या पालकांना बरेच सल्ले दिले. अनेकांनी याला निव्वळ निष्काळजीपणा म्हटलं. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच यावर हजारो कमेंट्सही आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात