जाहिरात
मराठी बातम्या / Viral / इवल्याशा पक्षाने वाघाची हवा केली टाईट; जीव वाचवून पळाला प्राणी, Video एकदा बघाच

इवल्याशा पक्षाने वाघाची हवा केली टाईट; जीव वाचवून पळाला प्राणी, Video एकदा बघाच

पक्षाने वाघाची हवा केली टाईट

पक्षाने वाघाची हवा केली टाईट

वाघ सुरुवातीला हंसाचा पाठलाग करत असतो. मात्र, तो राजहंसावर झेपावण्यापूर्वी, हंसच डाव पलटवतो आणि वाघाचा पाठलाग सुरू करतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 जुलै : वाघ हा प्राण्यांमधील शक्तिशाली आणि भयानक शिकारी मानला जातो. हा प्राणी समोरून जाताना दिसला की इतर लहान प्राणी किंवा पक्षी आपला मार्ग बदलतात. हे प्राणी अगदी लहानपणापासूनच आपल्या पिल्लांना शिकारीचं प्रशिक्षण देतात. यामुळेच समोर छोटा वाघ दिसला तरी लोकांचा थरकाप उडतो. पण तुम्ही कधी वाघाला घाबरून पळताना पाहिलं आहे का? सध्या इंस्टाग्रामवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वाघाचं पिल्लू हंसाच्या भीतीने पळताना दिसत आहे. हा मजेदार व्हिडिओ @animalonplanet नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ च्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, डाव कसा पलटला. निसर्गाचा नियम आहे, की वाघ हरण, कोंबडी आणि इतर वन्य प्राण्यांना खातात.. मात्र यामध्ये एक छोटा हंस वाघाच्या पिल्लाला घाबरवताना दिसत आहे. हा पक्षी त्याचा पाठलाग करतो आणि वाघ पळून जाऊन पिंजऱ्यात लपतो. हे एक दुर्मिळ दृश्य आहे, कारण असे व्हिडिओ सामान्यतः पाहायला मिळत नाहीत. हंस आणि वाघ यांच्यातील ही झुंज पाहून लोकांना आश्चर्य वाटलं.

जाहिरात

हा प्राणीसंग्रहालयातील व्हिडिओ असून हे दोघंही एकमेकांशी खेळताना दिसत आहेत. क्लिपच्या सुरुवातीला वाघ हंसाचा पाठलाग करताना दिसतो. वाघ सुरुवातीला हंसाचा पाठलाग करत असतो. मात्र, तो राजहंसावर झेपावण्यापूर्वी, हंसच डाव पलटवतो आणि वाघाचा पाठलाग सुरू करतो. Viral Video: घराबाहेर काढलेल्या शूजमधून येत होता अजब आवाज; आत डोकावताच बसला धक्का या हल्ल्याने वाघ इतका घाबरतो की तो स्वतःला वाचवण्यासाठी पळू लागतो. तो पिंजऱ्यात जाईपर्यंत हंस त्याचा पाठलाग करतो. एक दिवसापूर्वी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता आणि आतापर्यंत तो 30 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. हजारो लोकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, वाघाने याच्यापासून जपून राहायला हवं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात