मुंबई, 28 नोव्हेंबर : प्राण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जंगली प्राण्यांना, वाघाला लांबून पाहण्यात किंवा व्हिडीओत पाहण्याचीच मजा आहे. वाघाला समोर पाहून सर्वांचीच भंभेरी उडते. अचानक वाघ एखाद्याच्या समोर आला, तर त्याची काय अवस्था होईल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अशाच प्रकारचा एक भयानक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये वाघाने एका लोकांच्या गर्दीवरच हल्ला केल्याचं दिसतंय. एक वाघ लोकांवर हल्ला करण्यासाठी त्या गर्दीत घुसतो. वाघाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी लोक सैरावैरा पळू लागतात. वाघ अचानक समोर आल्यानंतर घाबरलेल्या लोकांच्या किंकाळ्या, आरडा-ओरडाही या व्हिडीओमध्ये ऐकू येतोय.
लोक आपला जीव वाचवण्यासाठी इथे-तिथे पळतात. त्याचवेळी गर्दीतील एका व्यक्तीवर वाघाचा जबरदस्त हल्ला होतो. वाघ लांब उडी मारत, त्या व्यक्तीवर तुटून पडतो आणि त्याला जमिनीवर पाडतो. या हैराण करणाऱ्या घटनेचा व्हिडीओ आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
वाघ लोकांच्या गर्दीत घुसतो, सर्वच जण या अचानक झालेल्या हल्ल्यानंतर पळापळ करू लागतात. याचवेळी या गर्दीतल्या एका मागे राहिलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला चढवला. पण त्या व्यक्तीचं दैव बलवत्तर म्हणूनच वाघाच्या हल्ल्यानंतरही त्या व्यक्तीची वाघाच्या तावडीतून सुटका होते.
Chasing a human being is not the true nature of a tiger. To arrive at a win-win situation in such human-tiger negative interface, keeping a safe distance and giving space to the animal do work. Via @firozahm @ShivAroor pic.twitter.com/uA7Ujo1qjw
— Ramesh Pandey IFS (@rameshpandeyifs) November 25, 2020
वाघ त्याच्यावर हल्ला करतो, पण त्याला आपली शिकार बनवू शकत नाही आणि तो वाघ त्या व्यक्तीला सोडून जंगलाच्या दिशेने जातो. हा थरारक व्हिडीओ व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांकडून व्हिडीओवर आश्चर्यचकित करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहे.