भारतात पहिल्यांदाच या श्वानाने केलं पॅराग्लाइडिंग; हा VIRAL VIDEO पाहाच
भारतात पहिल्यांदाच या श्वानाने केलं पॅराग्लाइडिंग; हा VIRAL VIDEO पाहाच
Photo credits: huskyindia0
नवाब हा हस्की जातीचा कुत्रा आहे. या नवाबचं इन्स्टाग्राम अकाउंटही आहे. त्याच्या इन्स्टा अकाउंटनुसार, हा पहिलाच असा इंडियन कुत्रा आहे, ज्याने पॅराग्लाइडिंग केलं आहे.
नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : पॅराग्लाइडिंग करणं अनेकांचं स्वप्न असतं. पण एखाद्या कुत्र्याने पॅराग्लाइडिंग केल्याचं कधी ऐकलंय का? एका नवाब नावाच्या कुत्र्याने तब्बल 6500 फूट उंचीवर पॅराग्लाइडिंग केल्याची घटना घडली आहे. नवाब हा हस्की जातीचा कुत्रा आहे. या नवाबचं इन्स्टाग्राम अकाउंटही आहे. त्याच्या इन्स्टा अकाउंटनुसार, हा पहिलाच असा इंडियन कुत्रा आहे, ज्याने पॅराग्लाइडिंग केलं आहे.
हा नवाब ट्रेकिंगही करतो. रोहन त्यागी आणि त्यांची पत्नी हिमांशी या श्वानाचे मालक आहे. हे दोघे मिळून त्यांच्या नवाबचं इन्स्टाग्राम अकाउंट हँडल करतात. दोघेही त्याला ठिकठिकाणी फिरायला घेऊन जातात. नवाबचे इन्स्टावर तब्बल 10 हजार फॉलोवर्सही आहेत.
नवाबांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादमधून या श्वानाला आणलं असल्याने त्याचं नाव नवाब ठेवल्याचं, सांगण्यात आलं आहे. नवाब केवळ 35 दिवसांचा असताना त्याला रोहन त्यागीने घरी आणलं होतं.
2019 मध्ये नवाबचा तो पॅराग्लाइडिंग करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पॅराग्लाइडिंगवेळी नवाबला कोणतीही भीती वाटत नसल्याचं, रोहन त्यागीने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.