जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अंतराळात अंतराळवीर शॅम्पूने कसे धुवत असतील केस; हा VIDEO एकदा पाहाच

अंतराळात अंतराळवीर शॅम्पूने कसे धुवत असतील केस; हा VIDEO एकदा पाहाच

अंतराळात अंतराळवीर शॅम्पूने कसे धुवत असतील केस; हा VIDEO एकदा पाहाच

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात नासाच्या अंतराळवीर (NASA astronaut) कॅरेन नायबर्ग (Karen Nyberg) आपण पृथ्वीवर सहजपणे करत असलेलं, शॅम्पूने केस धुण्याचं काम अंतराळवीरांच्या स्टाईलमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये करताना दिसत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 10 नोव्हेंबर : अंतराळ (space) हे अनेकांसाठी आकर्षणाचं ठिकाण, अनेकांसाठी मोठा उत्सुकतेचा विषय आहे. अंतराळातील विहारही तितकाचा उत्सुकतेचा विषय आहे. अंतराळवीर (astronauts) होणं हे जगातील सर्वांत आकर्षक प्रोफेशन आहे. त्यांचं काम जगावेगळं असतं त्यामुळे त्याचं आकर्षण अधिक वाटतं. जबरदस्त सायन्स-फिक्शन (Science-fiction) स्टार ट्रेकपासून (Star-Trek) ते द मारशियन (The Martian) पर्यंत अनेक चित्रपटात अंतराळ आणि तेथील जीवन अतिशय उत्कृष्टपणे दर्शविलं आहे. तिथे वर पृथ्वीपासून आणि आपल्या घरापासून दूर राहून कसं वाटत असेल आणि अंतराळातील ते अनुभव किती मजेशीर असतील असं अनेकांना वाटत असेल. पण पृथ्वीवरच्या इतर प्रोफेशनच्या तुलनेत हे प्रोफेशन अनेक पटींनी आव्हानात्मक आहे. पृथ्वीवर राहणाऱ्यांना किमान या समाधानावर राहू शकतात की, रोज त्यांना आपल्या घरी जाता येतं, गरमागरम अन्न खायला मिळतं आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्यांच्या वजनाला जमिनीवर स्थिर ठेवतं. परंतु अंतराळात अंतराळवीरांना जेवणापासून ते अगदी बाथरूम वापरण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. (वाचा -  NASA मध्ये कम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी संस्कृत भाषा वापरली जाते? जाणून घ्या काय आहे सत्य ) एकीकडे जिथे अनेक चित्रपटांत आणि टीव्ही शोजमध्ये आपल्याला अंतराळातील काल्पनिक (फिक्शनल) गोष्टी दिसतात. कुठे कोणी अंतराळात जगण्याचा संघर्ष करताना दिसतो तर कुठे एलियन्स पृथ्वीवर हल्ला करताना दिसतात. पण अंतराळातील खरा संघर्ष अनेक पटींनी वेगळाच आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात नासाच्या अंतराळवीर (NASA astronaut) कॅरेन नायबर्ग (Karen Nyberg) आपण पृथ्वीवर सहजपणे करत असलेलं, शॅम्पूने केस धुण्याचं काम अंतराळवीरांच्या स्टाईलमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये करताना दिसत आहेत.

(वाचा -  पगार नाही मन मोठं असावं लागतं; सफाई कर्मचाऱ्याला 20000 पगार, पण लाखोंचं केलं दान )

हा व्हिडिओ खरं तर जुना असून तो reddit या वेबसाइटवर रिशेअर केला गेला आहे. Damnthatsinteresting या नावाच्या सबरेड्डीटने हा व्हिडिओ रिशेअर केला गेला आहे. इथे पाहा VIDEO या व्हिडिओ मध्ये कॅरेन नळीने डोक्याला आधी थोडंसं पाणी लावताना दिसतात. ज्यातलं काही पाणी हवेत तरंगत दूर जाताना दिसतं. त्या पटकन त्या पाण्याला हातात घेऊन आपल्या केसाला लावतात. त्यांचे केस वाऱ्यानी उडताना उभे होतात तसे दिसतात. ते तसेच राहतात. पाणी हे अंतराळात अंतराळवीरांसाठी अत्यंत ‘मौल्यवान’ आहे कारण ते जेवढं पाणी पृथ्वी वरून नेतात, तेव्हढंच पाणी त्यांच्याकडे असतं. म्हणून पाण्याचा वापर अंतराळात अगदी जपून केला जातो. पुढे कॅरेन आपल्या केसात ‘नो-रिन्स’ शॅम्पू लावतात. एका टॉवेलने केसात पूर्णपणे पसरवतात. धावत्या पाण्याशिवाय, अंतराळात टॉवेलच्या साहाय्याने केसातील धूळ ही टॉवेलने पुसून काढावी लागते असं त्या सांगतात. कॅरेन सांगतात की, अंतराळात सर्व काही रिसायकल होतं. त्यांच्या केसांसाठी वापरलेलं पाणीही बाष्पीभवन होऊन मग एअर-कण्डिशिंग सिस्टमच्या साहाय्याने घनरूप होऊन, ते त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा भाग होईल असंही त्या सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात