Home /News /viral /

झाडाखाली सेल्फी घेणं भावंडांना भोवलं; अचानक वीज कोसळल्यानं झाली भयंकर अवस्था, घटना कॅमेऱ्यात कैद

झाडाखाली सेल्फी घेणं भावंडांना भोवलं; अचानक वीज कोसळल्यानं झाली भयंकर अवस्था, घटना कॅमेऱ्यात कैद

सध्या सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात पाहायला मिळतं की तिघा भावंडांचा जीव थोडक्यात वाचला.

    नवी दिल्ली 16 जुलै : सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं पाहायला मिळतं. काही व्हिडिओ अत्यंत इमोशनल असतात तर काही व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही. सध्या सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात पाहायला मिळतं की तिघा भावंडांचा जीव थोडक्यात वाचला. हे तिघेही एका झाडाखाली उभा राहून सेल्फी घेत होते, इतक्यात झाडावर वीज कोसळली (3 Siblings Struck by Lightning). राहेल, इसोबेल आणि अँड्रयू जॉब्सन नावाचे हे तिघे भाऊ बहीण सायकल चालवत होते. मुसळधार पाऊस होत असल्यानं त्यांनी दक्षिण-पश्चिम लंडनमध्ये हॅम्पटन कोर्ट पॅलेसजवळ मोल्सी लॉक इथे थांबण्याचा निर्णय घेतला. तिघांनी झाडाखाली सेल्फी घेण्याचा विचार केला. त्यांनी फोटो क्लिक करताच वीज झाडावर कोसळली आणि ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. बापरे! किचनमध्ये घर करून बसले होते 17 विषारी साप; महिलेनं चूल पेटवली अन्... या घटनेबाबत बोलताना 23 वर्षीय इसोबेलनं सांगितलं, की ज्यावेळी वीज कोसळली आणि त्याचा फोटो क्लिक झाला तेव्हा संध्याकाळचे सुमारे पाच वाजले होते. आम्हाला पावसात एक फोटो घ्यायचा होता. अचानक मी जमिनीवर कोसळलो आणि जोराच्या आवाजाशिवाय काहीही ऐकू आलं नाही. माझा हात पूर्णपणे सुन्न झाला होता आणि हात हालवताही येत नव्हता. या घटनेत तिघेही जखमी झाले. बाईक चालवण्याची हौस तरुणीला पडली भारी! स्कूटी सोडून थेट बुलेटवरच बसली आणि... घटनास्थळापासून जवळच असलेल्या काही व्यक्तींनी त्यांना मदत केली. त्यांना तात्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं, याठिकाणी उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी सांगितलं, की एका सायकल दुर्घटनेनंतर इसोबेल यांच्या शरीरात बसवण्यात आलेल्या टायटेनियन प्लेटमुळे वीज त्यांच्या शरीरापर्यंत पोहोचू शकते. जे काही घडलं ते पाहून सगळेच चकीत झाले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Selfie photo, Viral news

    पुढील बातम्या