Home /News /viral /

Bike चालवण्याची हौस तरुणीला पडली भारी! स्कूटी सोडून थेट बुलेटवरच बसली आणि...

Bike चालवण्याची हौस तरुणीला पडली भारी! स्कूटी सोडून थेट बुलेटवरच बसली आणि...

बाईकवर (Bike) बसताच तरुणीसोबत काय घडलं पाहा.

  मुंबई, 15 जुलै : आपण कोणतीही गोष्ट शिकलो की त्यात आणखी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आपला असतो. ड्रायव्हिंगच्या (Driving) बाबतीतही तसंच आहे. आपल्याला गाडी (Vehicle) चालवायला यायला हवी असं प्रत्येकाला वाटतं. मग सुरुवातीला सायकलपासून (Cycle) ड्रायव्हिंग शिकण्याची सुरुवात होते. त्यानंतर स्कूटी (Scooter) आणि मग बाईक (Bike) शिकण्याचीही उत्सुकता असते. स्कूटी (Scooty) आणि बाईक (Motorcycle) यांच्या वजनात बराच फरक असतो. स्कूटी ही हलकी तर बाईक वजनदार असते. त्यामुळे शक्यतो बहुतेक तरुणी स्कूटी चालवतानाच दिसतात. काही तरुणी बाईकही (Girl's bike riding) चालवण्यात मागे नाही. मग प्रत्येकाला हे जमेलच असं नाही. त्यातही प्रॅक्टिस नसेल तर मग काही खरं नाही. सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडीओ (Girl trying to drive bike) व्हायरल होतो आहे. जिला बाईक चालवण्याची हौस चांगलीच महागात पडली आहे (Girl fell from bullet bike). तरुणी स्कूटी सोडून बाईक चालवायला जाते. तीसुद्धा साधीसुधी बाईक नाही तर थेट बुलेटवर जाऊन ती बसते. बुलेट चालवायला जाते. पण तिचा ही हौस तिला चांगलीच भारी पडली आहे. तिचा प्रयत्न फसला आहे. नेमकं काय झालं ते या व्हिडीओतच पाहा.
  व्हिडीओत पाहू शकता, एक तरुणी सुरुवातीला स्कूटीवर आहे. रस्त्याच्या एका बाजूला ती आपली स्कूटी तशीच ठेवते. स्कूटीवरून एकदम स्टाइलमध्ये उठत चालत पुढे येते. हे वाचा - देवाच्या परीक्षेसाठी लेकीचा जीव घातला धोक्यात; आईने 193 किमी स्पीडने पळवली कार रस्त्यावर पुढे एक बुलेट उभी आहे. स्कूटीऐवजी बाइक चालवण्याची हौस तरुणीला आहे. त्यातच ही बुलेट दिसते. मग काय ती स्वतःला आवरू शकत नाही. बाइक चालवण्याच्या हौसेपोटी स्कूटी सोडून थेट बुलेटवर बसते. बुलेट चालवणं तर दूरची गोष्ट. तरुणी बुलेटवर बसताच तिला तिचाही तोल सावरत नाही. बुलेट उभी असतानाच त्यावर ती बसते आणि धाडकन तिथंच कोसळळेत. बुलेटचं वजन न झेपल्याने तरुणी काही बुलेट चालवू शकत नाही. हे वाचा - आगीच्या भीतीनं आईनं इमारतीवरुन खाली फेकलं बाळ अन्...; थरकाप उडवणारा VIDEO gedi.route.chandigarh इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सना हसू आवरलेलं नाही. शिवाय यावर कमेंट कऱण्यापासूनही कुणी स्वतःला आवर घालू शकला नाही. तरुणीच्या फजितीची पुरेपूर मजा सर्वणजण घेत आहेत. एका युझरने स्कुटीइतकं बुलेटचं वजन नसतं, हे तरुणीला समजायला हवं होतं असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युझरने आता मॅडम आयुष्यात चुकूनही बुलेड राइडवर जाणार नाही, असं म्हटलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bike riding, Funny video, Viral, Viral videos, While driving

  पुढील बातम्या