VIDEO: 'माझा होशील ना', सईच्या मदतीसाठी आला डॅडा; मात्र घडलं भलतच

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’ मध्ये सध्या सई आणि आदित्यच्या आयुष्यात अनेक संकटे येत आहेत.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’ मध्ये सध्या सई आणि आदित्यच्या आयुष्यात अनेक संकटे येत आहेत.

  • Share this:
    मुंबई, 22 जून- ‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na)  मालिकेमध्ये सध्या आदित्य (Aaditya) आणि सईच्या (Sai) आयुष्यात अनेक अडचणी येत आहेत. ते दोघेही आपलं घर सोडून एका मध्यमवर्गीय वस्तीमध्ये येऊन राहिले आहेत आणि रोजच्या जगण्यासाठी धडपड करत आहेत. तसेच सिंधू मामीसुद्धा त्यांच्या आयुष्यात अनेक संकट उभी करत आहे. तर दुसरीकडे सईचे आई आणि बाबा आपल्या मुलीला या अवस्थेत बघून चिंतेत आहेत. मात्र सईनं त्यांची कोणतीही मदत घ्यायला किंवा त्यांच्यासोबत जायला नकार दिला आहे आणि म्हणूनचं तिचे बाबा वेषांतर करून तिच्या मदतीसाठी घरी आले आहेत.
    झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’ मध्ये सध्या सई आणि आदित्यच्या आयुष्यात अनेक संकटे येत आहेत. दादा मामांसोबत झालेल्या वादानंतर आदित्यने आपलं घर सोडलं आहे. त्यामुळे पत्नी म्हणून सईलासुद्धा ब्रह्मेचं घर सोडावं लागलं आहे. आत्ता हे दोघेही एका मध्यमवर्गीय वस्तीत येऊन राहिले आहेत. दोघांच्याही हातात नोकरी नसल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्याव लागत आहे. एकवेळच्या जेवणासाठीही ते वणवण करत आहेत. त्यात सिंधू मामी त्यांच्या आयुष्यात दररोज एक नवं संकट आणून उभ करत आहे. (हे वाचा:  पाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL ) मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये सईचे डॅडा म्हणजेच तिचे बाबा सईला मदत करण्यासाठी तिच्या घरी आले आहेत. सईने त्यांची मदत घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांनी एका घरकाम करणाऱ्या महिलेच्या वेशात आले आहेत. मात्र ते आपल्या स्वभावाने काम आवरण्य ऐवजी अजून जास्त काम वाढवून ठेवतात. हा भाग मजेशीर रित्या दाखवण्यात आला आहे. मात्र सई ही त्यांची एकुलती एक मुलगी आहे. खुपचं लाडात वाढली आहे. आणि त्यामुळेच तिच्या डॅडाला तिची ही अवस्था बघवत नाही. आणि म्हणून ते तिला मदत करण्याचा असा मार्ग निवडतात.
    Published by:Aiman Desai
    First published: