13 मुलं, 6 लग्न! हा 'टिकटॉक स्टार' व्हिडीओ पाहून करतो तरुणींशी लग्न

13 मुलं, 6 लग्न! हा 'टिकटॉक स्टार' व्हिडीओ पाहून करतो तरुणींशी लग्न

पाकिस्तानमध्ये 13 मुलांचा बाप असलेला एका टिकटॉक स्टार सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 22 मार्च : टिकटॉकचे वेड सध्याच्या युगात काही नवीन नाही. लाखो तरुण-तरूणी आपल्या फोनवर व्हिडीओ तयार करून टिकटॉक स्टार झाले आहेत. मात्र पाकिस्तानमध्ये 13 मुलांचा बाप असलेला एका टिकटॉक स्टार सध्या चर्चेचा विषय झाला आहे. या टिकटॉक स्टारकडून आपल्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यासाठी त्याच्या पत्नीने न्यायालयात धाव घेतली आहे. ‘डॉन’ वृत्तपत्राच्या वृत्तानुसार या महिलेने आपल्या पतीचे नाव ‘टिकटॉक डॅडी’ ठेवले आहे.

या महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध तक्रार केली आहे. हा टिकटॉक स्टार या अॅपच्या एवढा आधीन गेला की आपल्या मुलांकडूनही तो व्हिडीओ तयार करून घेतो. या टिकटॉक स्टारचे नाव वाहीद मुराद असून त्याने चार लग्न केली आहेत. न्यायालयात धाव घेतलेली ही त्याची तिसरी पत्नी आहे.

वाचा-एक कप चहा आहे कोरोनावर रामबाण उपाय? वाचा काय आहे सत्य

एक डझनपेक्षा जास्त मुलं

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पतीला एकूण 13 मुलं आहेत. चार लग्नांव्यतिरिक्त आधी दोन लग्न केले होते. कौटुंबिक कोर्टाचे न्यायाधीश समीउल्ला खान यांनी महिलाच्या याचिकेनंतर वाहीद मुरादला नोटीस बजावली आणि 2 एप्रिल रोजी तिला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या महिलेने तिच्या पतीवर असा आरोप केले की लग्नानंतर तो आपल्या बायका आणि मुलांची काळजी घेत नाही, तर, फक्त त्यांची काळजी घेतो, ज्या त्याला व्हिडीओ तयार करण्यासाठी मदत करतात. या महिलेने सांगितले की, तिची दोन्ही मुल वडीलांप्रमाणे टिकटोक व्हिडिओ तयार करत आहेत.

वाचा-गर्भवती गर्लफ्रेंडची YOUTUBE वर पाहून केली डिलिव्हरी, असा केला जीवाशी खेळा

या अभिनेत्याच्या नावाने ओळख

टिकटॉवर वाहीद मुरादचे 14 हजार फॉलोअर आहेत. त्याचे नाव हे पाकिस्तानचा प्रसिद्ध अभिनेता आणि चॉकलेट हिरो वाहीद मुरादवरून ठेवण्यात आले आहे. या महिलेने आपल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की तिचा नवरा मला किंवा मुलांची काळजी घेत नाही. मुलांना शाळेत पाठवताना त्यांना मारहाण करायचा. आता मुलांनाही टिकटॉक व्हिडीओ तयार करण्यासाठी प्रवृत्त केले आहे.

वाचा-मगरीच्या तावडीतून सुटली पण आयुष्याची झुंज हरली, अंगावर काटा आणणारा थरारक VIDEO

टिकटॉकमुळे मुलांना शाळेतून काढले

आपल्या याचिकेत या महिलेने असे म्हटले आहे की, टिकटॉक व्हिडिओमुळे पतीने दोन्ही मुलांचे शिक्षण थांबवले. आपल्या मुलाला शाळेत पाठवावे यासाठी या महिलेने कोर्टाला विनंती केली की पतीने तिची आणि मुलांची काळजी घ्यावी किंवा त्यांना आपल्या ताब्यात द्यावे अशी मागणी आहे.

First published: March 22, 2020, 11:56 AM IST
Tags: tiktok

ताज्या बातम्या