FACT CHECK : एक कप चहा आहे कोरोनावर रामबाण उपाय? वाचा काय आहे सत्य

FACT CHECK : एक कप चहा आहे कोरोनावर रामबाण उपाय? वाचा काय आहे सत्य

भारतीय संशोधकांना चहा हे कोरोनावर रामबाण उपाय असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • Share this:

आसाम, 22 मार्च : कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 11 हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 300हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असले तरी अद्याप कोरोनावर ठोस उपाय सापडलेला नाही आहे. अमेरिकेत कोरोना लसीची चाचणी होत आहे, तर फ्रान्सने लस शोधल्याचा दावा केला आहे.

या सगळ्यात भारतीय संशोधकांना चहा हे कोरोनावर रामबाण उपाय असल्याचे स्पष्ट केले आहे. ब्लॅक टी हा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य पर्याय आहे. कारण चहा हे अँटी व्हायरल गुणधर्म असलेले सर्वात नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट पेय आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी चहा पिणे आवश्यक आहे, असा दावा डॉक्टर प्रीतम चौधरी यांनी केला आहे.

वाचा-14 नाही तर आता 5 दिवसांत समजणार कोरोना, ही आहेत नवी लक्षणं

वाचा-#Breaking राज्यात कोरोनाने घेतला दुसरा बळी, 63 वर्षीय व्यक्तीचा मुंबईमध्ये मृत्य

कोरा चहा किंवा ब्लॅक टीचे सेवन केल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती तर वाढतेच त्याचबरोबर  थेफ्लॉव्हिन (Theaflavin) आणि पॉलीफेनॉल हेपेटायटीस (Polyphenols) या विषाणूचा प्रवेश रोखला जातो.

वाचा-आता कोरोनाची टेस्ट खासगी लॅबमध्येही होणार, काय असेल किंमत जाणून घ्या

त्यामुळे आसाममधून येणाऱ्या ब्लॅक टीकडे कोरोना व्हायरसवरचा रामबाण उपाय म्हणून पाहिले जात आहे. जोरहाट आसाममधील चहा असोसिएशनच्या संशोधनात असे म्हटले आहे की, ब्लॅक टी हा संभाव्य उपाय असू शकतो. असे असले तरी चहा हे सर्वच रुग्णांवर उपायकारक ठरेल असे नाही. जर तुम्हाला कोरोनाची लक्षण वाटत असतील तर रोज एक कप चहा तुमची प्रतिकारशक्ती वाढवेल. त्यामुळं कोरोना रोखण्यासाठी ब्लॅक टीकडे एक उपाय म्हणून पाहिले जाऊ शकते.

वाचा-कोरोनाचं नवं केंद्र आहे 'हे' शहर, दर 3 मिनिटाला होतोय एकाचा मृत्यू

शास्त्रज्ञांनी शोधली कोरोनाची नवी लक्षणे

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूची लक्षणे समजण्यासाठी 5 दिवस पुरेसा कालावधी आहे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शरीरात ही 3 लक्षणं दिसल्यानंतर कोरोना विषाणूचा धोका लवकर समजू शकतो. इंटर्नल मेडिसीन जर्नलच्या अहवालानुसार, कोरोना विषाणूची तीन विशिष्ट लक्षणे पहिल्या पाच दिवसात आढळतात. यात अमेरिकन संशोधकांनी प्रसिद्ध केलेला हा अहवाल सांगतो की कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर पहिल्या 5 दिवसांत एखाद्या व्यक्तीला कोरडा खोकला येणे सुरू होते. हे कोरोनाचे पहिले लक्षण आहे.

First published: March 22, 2020, 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading