मगरीच्या तावडीतून सुटली मात्र आयुष्याची झुंज हरली, अंगावर शहारे आणणारा हल्ल्याचा VIDEO

मगरीच्या तावडीतून सुटली मात्र आयुष्याची झुंज हरली, अंगावर शहारे आणणारा हल्ल्याचा VIDEO

मगरीचा हल्ला इतका भयंकर होता की महिला रक्तबंबाळ झाली होती. या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

  • Share this:

वडोदरा, 20 मार्च : तलावात अंघोळीला गेलेल्या महिलेवर एका मगरीनं हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की त्यातून सुटका करणं या महिलेला कठीण होतं. या महिलेनं जीवाच्या आकांतानं तलावात हातपाय मारण्यास सुरुवात केली. मगरीच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. तलावाबाहेर असलेल्या लोकांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तातडीनं महिलेचा जीव वाचवण्यासाठी हातात जे मिळेल ते घेऊनन तलावात उड्या मारल्या. कोणाच्या हातात काठी होती तर कोणाच्या हातात दगड होता. मात्र मगर एवढी बलाढ्य होती की तिच्या जवळ जाण्याची हिम्मत कुणी करत नव्हतं. अखेर महिलेनं धाडस करत मगरीचे डोळ्यांवरच हल्ला केला. त्यामुळे मगर सैरभैर झाली. या महिलेनं धाडस दाखवत आपली सुटका केली आहे. महिलेनं मगरीपासून स्वत: सुटका करून घेतल्याची अंगावर काटा आणणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे वाचा-महाभयंकर विषाणूबाबत बिल गेट्स यांनी 5 वर्षांपूर्वीच केली भविष्यवाणी, पाहा VIDEO

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं महिला या मगरीच्या हल्ल्यापासून आपली सुटका करून घेत आहे ते. दरम्यान या महिलेनं मगरीच्या डोळ्यांवर हल्ला केल्यानंतर ती थोडी गडबडली त्यामुळे महिलेला तिच्या तावडीतून सुटणं शक्य झालं. तलावाजवळ असणाऱ्या लोकांनी महिलेचा हे धाडस पाहून तलावात तिला वाचवण्यासाठी उड्या घेतल्या लोकांच्या आवाजानं या मगरीनं धूम ठोकला. काही अंतर ही महिला पोहत आल्यावर तिला स्थानिकांनी तलावाबाहेर आणलं आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र या मगरीचा हल्ला इतका भयंकर होता की महिला रक्तबंबाळ झाली होती. या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हे वाचा-कोरोनामुळे घरात बंदिस्त लोकांचा Video एकदा पाहा; जॅकलिन, कतरिनाचा वर्कआऊट विसराल

First published: March 20, 2020, 11:38 AM IST

ताज्या बातम्या