तामिळनाडू, 22 मार्च : लव्ह, सेक्स आणि धोका अशा अनेक घटना आपण पाहिल्या असतील पण एक असं प्रकरण समोर आलं ज्याचा विचारसुद्धा आपण करू शकत नाही. एका तरुणाने स्वत: च्या प्रेयसीची युट्यूब पाहून डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली. या अतिशाहणपणाचा इतका भयानक परिणाम झाला आहे की गर्भवती तरुणी आता जीवन-मरणाची झुंज देत आहे. तर सगळ्यात धक्कादायक यात बाळाचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण तिरुवल्लूर जिल्ह्यातील आहे. पाथीर्वेडू पोलिसांनी गुरुवारी एका 27 वर्षीय व्यक्तीला हत्येच्या आरोपाखाली अटक केली. त्याने 19 वर्षीय प्रेयसीच्या गर्भाशयातून भ्रूण काढून टाकण्यासाठी त्याने बॉटकेड शस्त्रक्रिया केल्याचे आढळले. युट्यूबवर पाहून त्याने प्रेयसीची गर्भधारणा करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय व्यक्ती कामरापालमचा रहिवासी असून तो एलपीजी सिलिंडरचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. हे दोघे दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असल्याचे सांगण्यात आले, ती मुलगी महाविद्यालयात बी कॉमची दुसरी वर्षाची विद्यार्थिनी होती. ही मुलगी आठ महिन्यांपासून गरोदर होती. पण दोघांचे लग्न होत नव्हते कारण मुलाच्या कुटूंबाने त्याला विरोध केला. यानंतर दोघांनाही कुणालाही न सांगता प्रसूती करण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही एका शेतात पोहोचले आणि ही घटना तिथेच घडली. रक्तस्त्राव झाल्यानंतर मुलाने तिला जवळच्या रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी मुलीला त्वरित ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल केले. मुलीने त्याच ठिकाणी मृत मुलाला जन्म दिला. रुग्णालयाच्या आवारातच या युवकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. महिलेची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगितले जाते. मुलाविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आता सगळे तरुणीच्या आरोग्याची प्रार्थना करत आहे. तिरुवल्लूर जिल्ह्यातील एसपीने माध्यमांना सांगितले आहे की, महिलेच्या वक्तव्यानंतर त्या व्यक्तीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली गेली होती, त्यानंतर दोघांच्या पालकांची चौकशी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.