जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / तक्रार द्यायला पोलिसांत गेलेली महिला पतीसमोर आरोपीसोबतच फरार; पोलीसही शॉक होऊन बघत राहिले

तक्रार द्यायला पोलिसांत गेलेली महिला पतीसमोर आरोपीसोबतच फरार; पोलीसही शॉक होऊन बघत राहिले

पतीसमोरच आरोपीसोबत फरार झाली महिला

पतीसमोरच आरोपीसोबत फरार झाली महिला

सोशल मीडियावर अश्‍लील फोटो टाकल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन परिसरात पोहोचलेल्या महिलेने पोलीस स्टेशनच्या गेटमधूनच आरोपी तरुणासह पळ काढला. हे पाहून महिलेच्या पतीला धक्काच बसला.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ 11 जून : प्रेमाचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात असाच एक प्रकार समोर आला आहे, जो ऐकून पोलीस अधिकारीही हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर अश्‍लील फोटो टाकल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी आमला पोलीस स्टेशन परिसरात पोहोचलेल्या महिलेने पोलीस स्टेशनच्या गेटमधूनच आरोपी तरुणासह पळ काढला. हे पाहून महिलेच्या पतीला धक्काच बसला. महिलेचे सासरे आणि माहेरकडील लोक आरडाओरड करत राहिले, मात्र विवाहितेने आई-वडील आणि सासऱ्यांचं न ऐकता आरोपी तरुणाच्या मोटारसायकलवर बसून पळ काढला. लोक बघत राहिले पण महिलेनं कोणाचंच ऐकलं नाही. हे बघून तिथे उभे असलेले सर्व पोलीस सुद्धा आश्चर्यचकित झाले. फरिदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गावात राहणाऱ्या एका महिलेचा विवाह बदायूं जिल्ह्यातील दातागंज भागात 2 वर्षांपूर्वी झाला होता. सासरच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने महिलेचे काही अश्लील फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे. याचा राग आल्याने सासरच्यांनी महिलेला शिवीगाळ केली. याला कंटाळून विवाहितेने आपल्या माहेरी जाऊन हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. Crime News: ज्या हातांवर काढली बायकोच्या नावाची मेहंदी त्याच हातांनी घेतला जीव, 17 दिवसात संसाराचा भयानक शेवट विवाहितेने तिचा पती , सासरे आणि आई-वडील यांच्यासोबत आरोपी तरुणाविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. दरम्यान, आरोपी तरुणही घटनास्थळी पोहोचला. लोकांना काही समजण्यापूर्वीच विवाहित महिला आरोपी तरुणाच्या मोटारसायकलवर बसली आणि तरुण तिला तेथून घेऊन गेला. विवाहित महिला आरोपी तरुणाच्या मोटारसायकलवर बसल्यावर घरच्यांना काहीच समजलं नाही. पाहता पाहता तरुणाने मोटारसायकल पळवली. हे पाहून कुटुंबीयांनी आवाज देत मोटारसायकलचा लांबपर्यंत पाठलाग केला. आजूबाजूचे लोकही मागे धावले, मात्र आरोपी तरुणाने भरधाव वेगाने मोटारसायकल काढून पळ काढला. विवाहित महिला आरोपीसह पोलीस ठाण्यातून पळून गेल्यावर विवाहितेच्या आईने फिर्याद दिली. यामध्ये आरोपी तरुणाने आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात