मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - बर्थडे आहे चोराचा! पोलिसांनीही केलं हटके विश; दिलं जबरदस्त 'गिफ्ट'

VIDEO - बर्थडे आहे चोराचा! पोलिसांनीही केलं हटके विश; दिलं जबरदस्त 'गिफ्ट'

चोराच्या बर्थडेला पोलिसांच्या शुभेच्छा.

चोराच्या बर्थडेला पोलिसांच्या शुभेच्छा.

चोराच्या बर्थडेचा व्हिडीओ पाहताच पोलिसांनी खास पद्धतीने त्याला शुभेच्छा दिल्या.

गुवाहाटी, 26 मे : आतापर्यंत तुम्ही बरेच बर्थ डे पार्टी, बर्थ डे सेलिब्रेशन पाहिले असतील. पण सध्या चर्चेत आला आहे तो एका चोराचा बर्थडे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण चोराच्या बर्थडेला चक्क पोलिसांनीही हटके विश केलं आहे. इतकंच नव्हे तर पोलिसांनी चोरट्याला असं जबरदस्त बर्थडे गिफ्ट दिलं आहे की तो आयुष्यात हा बर्थडे कधीच विसरणार नाही. चोराच्या या बर्थडेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

आसाममध्ये झालेलं चोरट्याचं हे बर्थडे सेलिब्रेशन. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कारणही तसंच आहे. चोरट्यांनी अगदी हटके पद्धतीने वाढदिवस साजरा करायचं ठरवलं आणि तसंच केलंही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरांची ही बर्थ डे पार्टी कैद झाली. त्यांनी ज्या पद्धतीने बर्थडे पार्टी केली ते पाहून पोलिसांनीही धक्का बसला.

बर्थ डे म्हटलं की केक आलाच. केकशिवाय बर्थडे सेलिब्रेशन नाहीच. पण प्रत्येक वेळी केकसह बर्थडे हॅप्पी होईलचं असं नाही. याचाच प्रत्यय आला तो या चोरट्यांना. चोरांनी चक्क एका बेकरीत बर्थ डे सेलिब्रेट केला.

VIDEO - जंगलाच्या राजाचा बर्थडे! थेट सिंहाजवळ केक घेऊन गेले तरुण; पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं

जोरहटमधील मनीषा बेकरीत मंगळवारी (23 मे) हे चोर घुसले. गितलू गोगोई आणि संजय पटनाईक अशी या चोरट्यांची नावं. बेकरीत घुसल्यावर त्यांनी तिथं असलेले एक हातात घेतलं. आधी एक केक त्यांनी कापला. त्यानंतर आणखी काही केक हातात घेऊन त्यांनी एकमेकांच्या तोंडावर मारले. बर्थडे पार्टीसाठी असलेल्या वस्तूंचाही त्यांनी वापर केला. वेगवेगळ्या पोझ देत फोटोही काढले. मनसोक्त डान्स केला.

...नाहीतर वाढदिवशीच मृत्यू गाठेल; बर्थडे सेलिब्रेशनआधी हा VIDEO एकदा जरूर पाहा

केक शॉपमध्ये त्यांनी बर्थडेला जीवाची मजा मजा केली. यानंतर कॅश काऊंटवरील 12 हजार रुपये चोरून तिथून ते पसार झाले. पण त्यांचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं.

त्यानंतर जोरहट पोलिसांनी या चोरट्यांना सोशल मीडियावर खास शुभेच्छा दिल्या. हॅप्पी बर्थ डे बॉय. असं कॅप्शन देत त्यांनी या चोरट्यांचे बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो, व्हिडीओ आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केले.

गुरुवारी (25 मे) या चोरांना अटक केली. पोलिसांकडून चोराला मिळालेलं हे मोठं बर्थडे गिफ्ट.

First published:
top videos

    Tags: Birthday, Thief, Thieves, Viral, Viral videos