Home /News /viral /

बोलणारे पोपट खूप पाहिले आता या पोपटाचा VIDEO एकदा पाहाच; कान आणि डोळ्यावरही विश्वास बसणार नाही

बोलणारे पोपट खूप पाहिले आता या पोपटाचा VIDEO एकदा पाहाच; कान आणि डोळ्यावरही विश्वास बसणार नाही

Amazing parrot Video : खरंतर या पोपटाचा व्हिडीओ तुम्ही आधी डोळे बंद करून फक्त ऐका आणि त्यानंतर डोळे उघडून पाहा.

  मुंबई, 20 जानेवारी : बोलणारा पोपट आता तुमच्यासाठी नवा नाही (Parrot Viral Video). एरवी विठू विठू करणारा पोपट माणसांप्रमाणेही बोलताना तुम्ही पाहिला असेल. त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून जे शब्द त्याच्या कानावर पडतात ते तो बोलतो. सोशल मीडियावर पोपटाचे असे बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. पण सध्या एका पोपटाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे (Amazing parrot Video). या पोपटाने असं काही करून दाखवलं आहे की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे. पोपटाची कला पाहूनच आश्चर्य वाटेल. खरंतर हा व्हिडीओ पाहण्याआधी तुम्ही डोळे बंद करून फक्त ऐका आणि त्यानंतर डोळे उघडून पाहा. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर तुमचा स्वतःचे कान आणि डोळे यावरही विश्वास बसणार नाही. आपण जे पाहतो आहे ऐकतो आहे ते खरं आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडेल. हे वाचा - हाच खरा हिरो! VIDEO पाहून कुत्र्याच्या धाडसाचं होतंय कौतुक; नेमकं काय केलं पाहा हा पोपटाचा व्हिडीओ डोळे बंद करून ऐकताना तुम्हाला चक्क आयफोनचा आवाज ऐकू येईल. तुमच्याकडे जर आयफोन असेल तर कदाचित तुम्हाला तुमचा फोन वाजला असं वाटेल. पण डोळे उघडून तुम्ही पाहाल, तर हा आवाज तुमच्याजवळील किंवा इतर कुणाजवळील आयफोनचा नाही तर चक्क या व्हिडीओतील पोपटाचा आहे (Parrot mimics iphone ringtone).
  View this post on Instagram

  A post shared by UNILAD (@unilad)

  हा पोपट हुबेहूब आयफोनच्या  iPhone रिंगटोनसारखा आवाज काढतो. या पोपटाने आयफोनची रिंगटोन इतक्या वेळा ऐकली आहे की आता तो त्याची नक्कल करण्यात पटाईत झाला आहे. बहुतेक वेळा तर त्याचा मालकही यामुळे गोंधळतो. पोपट रिंगटोनचा आवाज काढतो आणि त्याला आपला फोन वाजल्यासारखा वाटतो. हे वाचा - बापरे! चक्क 2 सिंहांसमोर छाती ताणत लढायला गेला तरुण आणि...; थरकाप उडवणारा VIDEO unilad नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या पोपटाचं नाव गुच्ची आहे. पोपटाचं हे अजब टॅलेंट पाहून बहुतेक नेटिझन्स त्याचे फॅन झाले आहेत. काहींनी तर असा पोपट कुठे मिळेल याचीही विचारणा केली आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Parrot, Viral, Viral videos

  पुढील बातम्या