जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मोठ्या कष्टानं घरात शिरला मात्र नाही आवरला अंघोळीचा मोह, चोराची झाली भलतीच फजिती

मोठ्या कष्टानं घरात शिरला मात्र नाही आवरला अंघोळीचा मोह, चोराची झाली भलतीच फजिती

मोठ्या कष्टानं घरात शिरला मात्र नाही आवरला अंघोळीचा मोह, चोराची झाली भलतीच फजिती

स्टीव्ह बाउर (Steve Bauer) आणि त्यांची पत्नी अशी दोघं त्यांच्या घरात होती. रात्री 11च्या दरम्यान त्यांची पत्नी टीव्ही पाहत होती. त्याचवेळी तिला आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये पाणी वाहत असल्याचा आवाज आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन 16 जून : चोरी ही काही गमतीची गोष्ट नव्हे; पण चोरी करताना काही गमती-जमती घडू शकतात. अशीच एक गंमत नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्नियात (California) घडली. स्टीव्ह बाउर (Steve Bauer) आणि त्यांची पत्नी अशी दोघं त्यांच्या घरात होती. रात्री 11च्या दरम्यान त्यांची पत्नी टीव्ही पाहत होती. त्याचवेळी तिला आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये पाणी वाहत असल्याचा आवाज आला. त्यामुळे तिला कोणी तरी परकी व्यक्ती घरात शिरल्याचा अंदाज आला. पत्नीने ही माहिती दिल्यावर स्टीव्ह यांनी आपली बंदूक घेतली आणि ते वरच्या मजल्यावर जायला निघाले. चोर आणि आपल्यात काही तरी चकमक, मारामारी घडेल अशी मनाची तयारी ठेवून स्टीव्ह वरच्या मजल्यावर गेले; पण प्रत्यक्षात झालं भलतंच. त्यांना एक भलतीच व्यक्ती केवळ टॉवेल लावून पायऱ्यांवर उभी असलेली दिसली. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नव्हती, तर चोर (Burglar) होता. घरात आल्या आल्या त्या चोराला अंघोळीची इच्छा झाली आणि तो बाथरूममध्ये शिरला. 25 वर्षांच्या त्या चोराचं नाव कॅरोला टियागो-फ्रेटास असं होतं. घराचं ग्लास पॅनेल तोडून त्याने घरात प्रवेश केला होता; चोरी करण्याऐवजी त्याने आधी अंघोळीचा (Bath) पर्याय निवडला. त्यामुळे स्टीव्ह यांच्या पत्नीच्या तिखट कानांनी तो आवाज टिपला आणि स्टीव्ह यांना जागृत केलं. त्यानंतर तो चोर अगदी अलगदपणे स्टीव्ह यांच्या ताब्यात आला. पोलीस येईपर्यंत त्यांनी बंदुकीच्या धाकावर चोराला अडवून ठेवलं. नंतर पोलीस येऊन त्याला पकडून घेऊन गेले. सीएनएन आणि लाड बायबल यांनी याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ब्लॅक कॅट कमांडोंना मिळतं 90 दिवसांचं अतिशय खडतर प्रशिक्षण, जाणून घ्या सॅलरी काही महिन्यांपूर्वीही असाच एक प्रसंग घडला होता. थायलंडमध्ये (Thailand) चोराने चोरीसाठी एका घरात प्रवेश कला; मात्र तिथे गेल्यावर त्याला अचानक दमल्याची जाणीव झाली. त्यामुळे तो तिथे चक्क झोपला. त्यात नेमकं ते घर होतं पोलीस अधिकाऱ्याचं. त्यामुळे पोलिसाने पाहिल्यावर त्या चोराची झोप उडवली आणि त्याला अटक केली. जेवण करत होता व्यक्ती; अचानक पक्षी आला अन्…, मजेशीर VIDEO VIRAL भारतातही गेल्या वर्षी अशीच एक गमतीची घटना घडली होती. आंध्र प्रदेशातल्या (Andhra Pradesh) पूर्व गोदावरी जिल्ह्यात एका चोराने एका घरात प्रवेश केला. त्याने रोकड चोरलीदेखील; मात्र एका खोलीत त्याला घराचा मालक झोपलेला दिसला. त्या खोलीत एसीही होता. त्यामुळे आपणही या खोलीत झोपेच्या दोन डुलक्या काढाव्यात, असा मोह त्या चोराला झाला. त्याने पुढचा-मागचा विचार न करता एका कॉटखाली पथारी पसरली; पण त्याच्या घोरण्याच्या आवाजामुळे घरमालकाला जाग आली. त्याने पाहिल्यावर पोलिसांत तक्रार केली आणि पोलीस त्याला पकडून घेऊन गेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात