Home /News /viral /

जेवण करत होता व्यक्ती; अचानक पक्षी आला अन्..., मजेशीर VIDEO VIRAL

जेवण करत होता व्यक्ती; अचानक पक्षी आला अन्..., मजेशीर VIDEO VIRAL

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Viral on Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पक्षी (Bird Video) एका व्यक्तीसोबत त्याच्याच ताटात चारा खात असल्याचं पाहायला मिळतं.

  नवी दिल्ली 16 जून : अनेकदा तुम्ही पक्षांना दाणे खातानाच पाहिलं असेल. या पक्षांना खाण्यासाठी बरेच लोक आपल्या घराच्या छतावर किंवा अंगणात धान्य टाकत असतात आणि आसपास कोणीच नाही याची खात्री करून पक्षी त्याठिकाणी येतात आणि ही दाणे खातात. मात्र, तुम्ही कधी एखाद्या पक्षाला माणसाच्या ताटात चारा खाताना पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Viral on Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पक्षी (Bird Video) एका व्यक्तीसोबत त्याच्याच ताटात चारा खात असल्याचं पाहायला मिळतं. पक्षाला दाणे खाताना अनेकांनी पाहिलं असेल, मात्र आता समोर आलेला हा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक व्यक्ती जेवण करत असतो. इतक्यात तिथे एक पक्षी येतो आणि हा पक्षी त्या व्यक्तीच्या ताटामध्ये खाऊ लागतो. हा व्हिडिओ अत्यंत इमोशनल आहे. साडेचार वर्षाच्या प्रिन्सनं पकडलेत 100 विषारी साप, त्या एक प्रसंगानं बनवलं धाडसी
  इंटरनेटवर व्हायरल झाला व्हिडिओ - पक्षाच्या हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये हा पक्षी अगदी आरामात या व्यक्तीच्या ताटातील पदार्थ खाताना दिसतो. आतापर्यंत हा व्हिडिओ अडीच लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. मेघराज देसाले यांनी हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. नेटकरी या व्हिडिओवर इमोशनल कमेंट करत आहेत. काही युजर्सनं व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या व्यक्तीचंही कौतुक केलं आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला असल्यानं तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Live video viral, Photo video viral

  पुढील बातम्या