मराठी बातम्या /बातम्या /देश /

ब्लॅक कॅट कमांडोंना मिळतं 90 दिवसांचं अतिशय खडतर प्रशिक्षण, जाणून घ्या सॅलरी

ब्लॅक कॅट कमांडोंना मिळतं 90 दिवसांचं अतिशय खडतर प्रशिक्षण, जाणून घ्या सॅलरी

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना (VVIP) संरक्षण देण्यासोबतच दहशतवादी हल्ल्यासारख्या कठीण परिस्थितीशी दोन हात करण्यासाठीही ब्लॅक कॅट कमांडो (Black Cat Commando) तैनात केले जातात.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना (VVIP) संरक्षण देण्यासोबतच दहशतवादी हल्ल्यासारख्या कठीण परिस्थितीशी दोन हात करण्यासाठीही ब्लॅक कॅट कमांडो (Black Cat Commando) तैनात केले जातात.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना (VVIP) संरक्षण देण्यासोबतच दहशतवादी हल्ल्यासारख्या कठीण परिस्थितीशी दोन हात करण्यासाठीही ब्लॅक कॅट कमांडो (Black Cat Commando) तैनात केले जातात.

नवी दिल्ली 16 जून : देशाचे पंतप्रधान, तसंच अन्य कोणीही अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतात, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला सुरक्षेसाठी जे जवान तैनात असतात, त्यांच्याकडे तुम्ही बारकाईने पाहिलंय का? त्यांनी पूर्ण अंगभर काळे कपडे घातलेले असतात. त्यांना ब्लॅक कॅट कमांडो असं म्हणतात. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना (VVIP) संरक्षण देण्यासोबतच दहशतवादी हल्ल्यासारख्या कठीण परिस्थितीशी दोन हात करण्यासाठीही ब्लॅक कॅट कमांडो (Black Cat Commando) तैनात केले जातात. अत्यंत कठोर प्रशिक्षणानंतर तयार झालेले हे कमांडो कोणत्याही विपरीत परिस्थितीला तोंड देण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांना पाहूनच समोरच्याला धडकी भरते. या ब्लॅक कॅट कमांडोंबद्दलची सविस्तर माहिती 'टीव्ही नाइन हिंदी'ने प्रसिद्ध केली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडे देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असते. या मंत्रालयांतर्गत सात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचा समावेश असतो. त्यात नॅशनल सिक्युरिटी गार्ड अर्थात NSGचा समावेश असतो. ब्लॅक कॅट कमांडो हे NSGचा भाग असतात. अर्थात NSGमध्ये ब्लॅक कॅट कमांडोंची भरती थेट होत नाही. त्यासाठी भारतीय लष्कर (Indian Army) आणि अन्य सशस्त्र दलांमधून सर्वोत्तम क्षमता असलेल्या जवानांची निवड केली जाते. 53 टक्के जवान भारतीय लष्करातून, तर उर्वरित जवान केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP), सीमा सुरक्षा दल (BSF), आरएएस (RAS) आदी दलांमधून निवडले जातात. या दलांत किमान 10 वर्ष कार्यरत असलेल्या, तसंच जास्तीत जास्त 35 वर्षांपर्यंतच्या वयाच्या जवानांचीच यासाठी निवड केली जाते.

या निवडलेल्या जवानांना एक आठवड्याचं प्राथमिक, मात्र कठोर प्रशिक्षण (Hard Training) दिलं जातं. त्यात जवळपास 80 टक्के जवान अपयशी ठरतात आणि केवळ 15 ते 20 टक्के जवानच निवडले जातात. प्रशिक्षणाची काठिण्यपातळी यावरून लक्षात येते. तत्पूर्वी शारीरिक आणि मानसिक चाचणीही घेतली जाते.

Covaxin साठी वासराचं सीरम वापरलं पण...; मोदी सरकार, Bharat biotech चं स्पष्टीकरण

या टप्प्यातून निवडल्या गेलेल्या जवानांना 12 आठवड्यांचं म्हणजे जवळपास तीन महिन्यांचं अत्यंत कठोर, खडतर प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणाच्या आधी जवानांची फिटनेस क्षमता 30 ते 40 टक्के असते, ती प्रशिक्षणानंतर 80 ते 90 टक्क्यांपर्यंत जाते. त्यांच्या या प्रशिक्षणात तऱ्हेतऱ्हेच्या युद्ध कौशल्यांचा समावेश असतो. शस्त्रांच्या सहाय्यानं, शस्त्रांशिवाय हल्ला कसा करायचा, आपल्यावर हल्ला झाला तर बचाव कसा करायचा अशा गोष्टी यात शिकवल्या जातात. आगीचे गोळे, गोळीबार यातून स्वतःचा बचाव कसा करायचा, अंधारात लक्ष्याचा अचूक वेध कसा घ्यायचा, बंदुकीची गोळी वाया न घालवता नेमकेपणाने शत्रुला ठार कसं करायचं अशा वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण घेऊन ब्लॅक कॅट कमांडो सज्ज झालेले असतात.

नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये (NSG Driver) ड्रायव्हर होण्यासाठीही खास प्रशिक्षण दिलं जातं. अवघड रस्ते, भू-सुरुंग, तसंच हल्लेखोरांकडून वेढलं गेलेलं असणं अशा स्थितीत वाहन कसं चालवायचं, याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं.

रोनाल्डोच्या एका कृतीमुळे 29323 कोटींचं नुकसान, Coca Cola ने दिली प्रतिक्रिया

स्वतःच्या जिवावर उदार होऊन कार्य करणाऱ्या ब्लॅक कॅट कमांडोंना वेतनही तितकंच भरभक्कम असतं. महिन्याला 84 हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंत वेतन त्यांना मिळू शकतं. त्याशिवाय अन्य सुविधा आणि भत्तेही त्यांना मिळतात. सातव्या वेतन आयोगानुसार, ऑपरेशन ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना वार्षिक 27,800 रुपये, तर नॉन-ऑपरेशनल ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना 21,225 रुपये ड्रेस भत्ता दिला जातो.

First published:

Tags: Indian army, Z security