मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ नेहमी आपल्यासमोर काही ना काही वेगळंच घेऊन येतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक, तर कधी विचित्र असतात. तर काही व्हिडीओ हे खूपच आश्चर्यकारक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो तुम्हाला विचित्र वाटेल. हा व्हिडीओ चोरीचा व्हिडीओ आहे. तुम्ही आत्तापर्यंत चोरी करताना चोरांना बाईक घेऊन तर कधी कार घेऊन तर कधी धावत देखील चोरी करताना पाहिलं असेल, पण कधी कोणाला घोड्यावरुन चोरी करताना पाहिलंय का? आधी UPI द्वारे पैसे पाठवणार, मग खाली करणार तुमची बँक; QR कोडचा हा Scam माहितीय का? हा प्रकार एका महिलेसोहबत घडला, जिथे या व्यक्तीने रात्रीच्या अंधारा घोड्यावरुन येऊन, महिलेची बॅग पळवली आहे. यासंबंधीत व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. घोड्यावरुन येत या व्यक्तीने महिलेला लुटलं. या महिलेला काहीही समजण्यापूर्वी तो तिच्या जवळ गेला आणि तिची बॅग पळवून नेली. बॅग सापडताच दरोडेखोर पळून गेला आणि ती गरीब मुलगी पुन्हा घराकडे निघाली.
या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लोक या व्हिडीओला वारंवार पाहत आहेत. जरी या चोरानं जे केलं त्याचं गांभिर्याकडे दुर्लक्ष केलं तर हा प्रकार कमाल असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. एकाने लिहिलं की सफेद घोड्यावर स्वप्नातला राज कुमार येतो, पण हा तर चोर निघाला.
लाफिंग__लेजेंड्स नावाच्या हँडलवरही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. दरोडेखोर घोड्यावर स्वार झालेला पाहून अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.