मराठी बातम्या /बातम्या /Viral /आधी UPI द्वारे पैसे पाठवणार, मग खाली करणार तुमची बँक; QR कोडचा हा Scam माहितीय का?

आधी UPI द्वारे पैसे पाठवणार, मग खाली करणार तुमची बँक; QR कोडचा हा Scam माहितीय का?

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

तुम्ही देखील UPIवापरत असाल तर तुम्हाला याबद्दल काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : दिवसेंदिवस टॅक्नोलॉजी अपग्रेट होत चालली आहे. जे आपल्यासाठी चांगलं देखील आहे. आता ऑनलाईन बँकिंग मोठ्याप्रमाणात वाढलं आहे. तसेच आता UPI देखील भारतात खूपच प्रसिद्ध आहेत. छोट्यापासून ते मोठ्या

ट्रँजॅक्शनपर्यंत UPI द्वारे पेमेंट केलं आहे. हे एक चांगला पर्याय आहे. यामुळे आपल्या खिशात पैसे ठेवावे लागत नाहीत. पण नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसंच काहीसं टॅक्नोलॉजीसंदर्भात देखील आहे.

हो कारण टॅक्नोलॉजीसोबत ठग लोक किंवा चोर देखील हुशार झाले आहेत आणि त्यांनी लोकांना फसवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधून काढले आहेत. हे लोक तरुणांपासून वृद्धांपासून सगळ्यांना टार्गेट करतात, म्हणून अशा परिस्थिती लोकांनी सतर्क रहाणे केव्ही चांगले.

फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय.

हल्लीच अशा काही बातम्या समोर येत आहेत, ज्यामध्ये UPIचा वापर करुन सर्वसामान्यांना सायबर गुन्हेगार फसवत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील UPIवापरत असाल तर तुम्हाला याबद्दल काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.

नक्की हे सायबर गुन्हेगार UPI मार्फत फ्रॉड करतात कसं?

यामध्ये आधी तुमच्या अकाउंटमध्ये चुकून काही पैसे पाठवले जातात, ज्यानंतर तुम्हाला कॉल किंवा मॅसेज येतो की त्यांच्याकडून हे चुकून झालं आहे, तर माणूसकी म्हणून ते परत पाठवा.

अशावेळेला हे फ्रॉड लोक एक स्कॅनर पाठवतात किंवा लिंक पाठवता. जर या लिंकवर वापरत्याकर्याने क्लिक केलं तर UPIबद्दलची सगळी माहिती एका माल्वेअरच्या मदतीने ठग्यांपर्यंत पोहोचते. तसंच काहीसं QR कोड च्या बाबतीत आहे. जर तुम्ही त्यांनी पाठवलेला कोड स्कॅन केला, तर तुमचं अकाउंट क्षणात खाली होऊ शकतो.

आपल्याला वाटतं की आपण फक्त समोरील व्यक्तीची आलेली रक्कम आपण त्यांना पाठवत आहे. पण असं नाही ते यासगळ्याच्या मार्फत तुमच्या डिव्हाइसची आणि UPIची सगळी माहिती मिळवतात.

त्यामुळे आता पुढच्यावेळेला तुमच्यासोबत देखील असं काही घडलं तर सतर्क रहा आणि पैसे पुन्हा अशा पद्धतीने पाठवण्याचा विचार करु नका. नाहीतर तुमचं अकाउंट देखील खाली होऊ शकतं.

First published:
top videos

    Tags: Fraud, Money, Online crime, Online fraud, Upi