मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! तरुणाने सासरच्या मंडळींसमोर स्वत:ला पेटवून घेतलं; घटनेचा भयावह VIDEO आला समोर

बापरे! तरुणाने सासरच्या मंडळींसमोर स्वत:ला पेटवून घेतलं; घटनेचा भयावह VIDEO आला समोर

या वादाचा भयावह व्हिडीओ समोर आला आहे.

या वादाचा भयावह व्हिडीओ समोर आला आहे.

या वादाचा भयावह व्हिडीओ समोर आला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
राजस्थान, 15 सप्टेंबर : कर्जाऊ घेतलेले पैसे देत नसल्यामुळे नाराज तरुणाने आपल्या सासरी अजमेरला जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं. आत्मदाह केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत (Shocking Video Viral on Social Medio) आहे. आत्मदाह केल्यानंतर तरुण खूप भाजला गेला. त्याला वाचविण्यासाठी आलेला मेव्हणाही अनेक ठिकाणी भाजला गेला आहे. दोघांना जवाहर लाल नेहरू रुग्णालयात ( Jawaharlal Nehru Hospital ) दाखल करण्यात आलं आहे. ही घटना राजस्थानमधील (Rajasthan News) अजमेर येथील आहे. या आगीत तरुणाची पत्नी, सासू, मेव्हणा आणि मेव्हण्याची पत्नी हेदेखील काही प्रमाणात भाजले गेले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलं आहे. घटनेच्या वेळी घरात कार्यक्रम सुरू होता. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा तरुण बोलत आहे. यावेळी समोरील एक व्यक्ती याचा व्हिडीओ शूट करीत आहे. तरुणाच्या सासरीच्या मंडळींनी सांगितलं की, रविवारी दुपारी साधारण 12 वाजता संदीप अचानक घरी आला. थोडा वेळ बसल्यानंतर ते स्वयंपाक घरात गेले आणि अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं. यावेळी पत्नी, सासू, मेव्हणा आणि मेव्हण्याच्या पत्नीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण संदीपने कोणाचच ऐकलं नाही. (The young man set himself on fire in front of his father in laws Horrible video ) हे ही वाचा-ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार थेट बसखाली आला अन्...; पाहा VIDEO या प्रकरणात जखमी संदीपची पत्नी रेखाने सांगितलं की, भाऊ अमरचंद याने लग्नाच्या वेळी काही पैसे कर्जाऊ घेतले होते. किती घेतले होते, याबद्दल माहिती नाही. रविवारी घरात एका कार्यक्रमादरम्यान संदीप आले व त्यांनी स्वत:वर रॉकेट टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
First published:

Tags: Fire, Rajasthan, Shocking news, Shocking viral video

पुढील बातम्या