Home /News /viral /

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार थेट बसखाली आला अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार थेट बसखाली आला अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

या व्हिडिओमध्ये दिसतं, की हायवेवरुन वेगात बस चाललेली आहे. मात्र, इतक्यात एका वळणावर दुचाकीस्वार बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. पाहता पाहता अचानक तो बसच्या खाली येतो.

    नवी दिल्ली 15 सप्टेंबर : इंटरनेटवर अनेकदा भयानक अपघाताचे व्हिडिओही (Shocking Accident Video) व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ पाहून एक गोष्ट तर नक्की समजते की अशा अपघातांमध्ये लोकांचं वाचणं जवळपास नाहीच्या समान असतं. मात्र, अनेकदा अपघातानंतर असं काही घडतं ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. सध्या सोशल (Social Media) मीडियावर देव तारी त्याला कोण मारी या वाक्याचा प्रयत्य देणारा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. मृत पिल्लाला सोंडेत घेऊन फिरताना दिसली हत्तीण; VIDEO पाहून पाणावतील डोळे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ गुजरातच्या दाहोदचा असल्याचं म्हटलं जात आहे. यात एका भयंकर अपघातात सुदैवानं दुचाकीस्वाराचा जीव वाचल्याचं पाहायला मिळतं. या व्हिडिओमध्ये दिसतं, की हायवेवरुन वेगात बस चाललेली आहे. मात्र, इतक्यात एका वळणावर दुचाकीस्वार बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. पाहता पाहता अचानक तो बसच्या खाली येतो. व्हिडिओ पाहताना काही सेकंद असं वाटतं की बसखाली हा युवक चिरडला गेला आहे. मात्र, काहीच वेळात तो बसच्या खालून सुरक्षित बाहेर येतो. बस थांबताच खाली अडकलेला व्यक्ती हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि अखेर बाहेर येतो. त्याला स्वतःलाही विश्वास बसत नव्हता की इतक्या भयंकर घटनेत तो बचावला आहे. इतर प्रवासी या युवकाची मदत करताना दिसतात. फोटोग्राफरनं केलेली ती कमेंट ऐकून भडकली मॉडेल; सर्वांसमोरच घडवली अद्दल, VIDEO हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांनी म्हटलं, याला म्हणतात नशीब. हा व्यक्ती मृत्यूच्या दारातून परत आला. आणखी एका यूजरनं म्हटलं, की अपघात नेहमीच जीवघेणे असतात. मात्र, इतकं चांगलं नशीब सर्वांचं नसतं. तर, काही यूजर्सनी म्हटलं, की भलेही या घटनेत दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे. मात्र, अशा घटनांमध्ये शक्यतो अनेकांना जीव गमवावे लागतात. त्यामुळे, गाडी चालवताना सावध राहाणं गरजेचं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bike accident, Shocking video viral

    पुढील बातम्या