शिवम सिंह, प्रतिनिधी भागलपूर, 29 जून : साप दिसायला कितीही सुंदर, सोज्वळ दिसला तरी त्याची भीती वाटतेच. सरळमार्गी हळूहळू वळवळत चालणाऱ्या सापाला बघूनही अंगभर काटा येतो. अशातच दोन तोंडांचा साप दिसला तर आपलं काय होईल, याचा आपण विचारही करू शकत नाही. मात्र असं खरोखर घडलं, एका घराचं काम करणाऱ्या मजुरांसोबत. ‘सुहागरात’नंतर सकाळीच बाळ; लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीच्या GOOD NEWS मुळे सासरचे शॉक बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील खगडा गावात एका घराचं बांधकाम सुरू आहे. या बांधकामात एक दोन तोंडांचा साप दडून बसला होता. वीट उचलताच मजुराला तो दिसला आणि मजूर जीव मुठीत घेऊन तिथून पळाला. सर्व मजूर एकामागोमाग एक बाहेर पडले. मग काही धाडसी व्यक्तींनी सापाला काठीच्या सहाय्याने उचलून एका डब्यात बंद केलं. मग वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर या दोन तोंडी सापाला ‘सॅण्ड बोआ’ म्हणतात, असं कळलं.
सॅण्ड बोआचं शास्त्रीय नाव ‘एरिक्स जॉनी’ असं आहे. ही सापांची एक दुर्मिळ प्रजाती आहे. हा साप प्रचंड महागडा असून त्याचा उपयोग विविध औषधं बनवण्यासाठी केला जातो. जादूटोण्यातही त्याला वापरलं जातं. शिवाय या सापापासून सौंदर्य प्रसाधने तयार केली जातात. त्यामुळे त्याला देश-विदेशात मोठी मागणी आहे. त्याची किंमत कोटींमध्ये असते. मात्र आता या प्रजातीचे फार कमी साप जिवंत आहेत. हा साप महागडा असल्यामुळे काही वर्षांपूर्वी भारतात त्याची मोठ्या प्रमाणावर अवैध विक्री व्हायची. या विक्रीला आळा बसावा यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत त्याला संरक्षण देण्यात आलं. त्यानुसार, हा दोन तोंडी साप पकडणं किंवा त्याची विक्री करणं हा कायदेशीर गुन्हा आहे.