मुंबई, 15 मे : काही जण कुत्रा पाळतात काही मांजर खारपासून ते अगदी पांडा पर्यंत अनेक प्राणी देशविदेशात पाळत असल्याचं आपण पाहिलं आहे. सध्या एका तरुणाच्या घरी असलेल्या प्राण्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. याचं कारणही तितकच खास आहे. हा तरुण कुत्रा समजून हा प्राणी घेऊन आला पण निघालं कोल्ह्याचं पिल्लू. मग काय सोशल मीडियावर या तरुणासह प्राण्याचेही फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
या तरुणानं आपल्या ट्विटर हँडलवरून एका छोट्या प्राण्यांचे अनेक फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मला हे पिल्लू रस्त्यावर आढळलं, मी त्याला माझ्या घरी घेऊन आलो. याचं नाव मी लुना ठेवलं आहे. याचा मालक कोण आहे हे माहीत नाही त्यामुळे मी याचे फोटो शेअर केले आहेत.'
ही घटना जपानच्या त्सुकिगाटा शहरात घडली आहे. एका युझर्सनं या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. हे कुत्र्याचं नाही तर कोल्ह्याचं पिल्लू आहे असंही युझर्सचं म्हणणं आहे. एका युझरनं तर चक्क रॅकूनचं पिल्लू असल्याचा दावा केला आहे. हा प्राणी कुत्र्यासारखा भुंकत नाही तर वेगवेगळे आवाज काढतो आहे. त्यामुळे कुत्रा नाही असंही एका युझरचं म्हणणं आहे.
याहू न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार ह्या तरुणाला अशा प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तो पिल्लाला घेऊन प्राण्यांच्या डॉक्टरकडे गेला. तिथे त्याला कळलं की हे कुत्राचं नसून कोल्ह्याचं पिल्लू आहे. त्यानंतर या तरुणानं हे पिल्लू फॉक्स सेंच्यूरी संस्थेकडे सोपवले. कोल्ह्याचं पिल्लू आणल्यानं सोशल मीडियावर ह्या तरुणाचे फोटो व्हायरल झाले आहेत.