जन्मदात्यानंच आवळला 6 वर्षांच्या मुलीचा गळा, नंतर समोर आलं धक्कादायक कारण...

जन्मदात्यानंच आवळला 6 वर्षांच्या मुलीचा गळा, नंतर समोर आलं धक्कादायक कारण...

जागतिक कुटुंब दिन साजरा होत असताना बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

बीड, 15 मे: जागतिक कुटुंब दिन साजरा होत असताना बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जन्मदात्याने आपल्या सहा वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केला आहे. वडवणी येथे ही घटना घडली असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अमृता गणेश शिंदे असं मृत मुलीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी बाप गणेश शिंदे याला अटक केली आहे.

हेही वाचा..35 दिवसांच्या चिमुरड्यानं कोरोनाला हरवलं, एका दिवसात 51 रुग्ण झाले ठणठणीत

डोकं सुन्न करणारी माहिती आली समोर...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोटच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. चौकशीतून डोकं सुन्न करणारी माहिती समोर आली आहे. अमृता ही सतत आजारी पडते म्हणून तिची गळा दाबून हत्या केल्याचं नराधम बापानं कबूल केलं आहे. आरोपी हा फुल विक्रेता आहे.

असा लागला छडा...

अमृता दोन दिवसांपासून बेपत्ता होती. कुटुंबाने आसपासच्या परिसरात शोधाशोध केली. मात्र, मुलगी मिळून आली नाही. दरम्यान मंगळवारी मुलीचा मृतदेह गावाशेजारील वाड्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेह मिळाल्यानंतर अमृताच्या वडिलांच्या चेहऱ्यावर कसलेच दुःख दिसून आले नाही. याबाबत त्याची कसून चौकशी केली असता मुलीचा खून त्याने केल्याचं समोर आलं. जागतिक कुटुंब दिनी जन्मदात्या बापानेच आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा.. शेतातील कामे करून घराकडे निघाला ट्रॅक्टर, वाटेतच 13 जणांवर घातला काळाने घाला

दरम्यान, राज्यात कोरोनाचा थैमान सुरु असताना बीड जिल्हात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या आठवड्यात एका 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मनीष गणेश घुले (वय- 22, रा. किट्टीआडगाव, ता. माजलगाव ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव होतं. 'मी खरं प्रेम केलं. . आज तुला सोडून जात आहे ' असा मजकूर लिहिलेली सुसाईट नोट आत्महत्या केलेल्या तरुणाच्या शर्टच्या खिशात सापडली होती.

माजलगाव तालुक्यातील किट्टआडगाव येथे शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मनीष याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनप्रवास संपवला. ' मी जीवनाला कंटाळलो आहे, माझ्या आईला सांभाळा, माझ्या नावावर असलेली एक एकर जमीन बहिणीला द्या. . अर्धा एकर माझ्या मित्राला द्या. . सावता रासवे मित्रा तू माझ्या आईला सांभाळ. . मी तुझ्यावर खरं प्रेम केलं . . मी तुला आज सोडून जात आहे ..' असा मजकूर मनीष याने चिठ्ठीत लिहिला आहे.

First published: May 15, 2020, 3:11 PM IST

ताज्या बातम्या