वॉशिंग्टन, 23 नोव्हेंबर : अमेरिकेसह संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढतो आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा लॉकडाउनसारखा निर्णय घेतला जात आहेत. अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे एका रेस्टोरंट मालकाने, आपलं रेस्टोरंट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या शेवटच्या दिवशी, हॉटेल बंद करण्यावेळी बियर पिण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने, हॉटेल मालकाच्या या निर्णयानंतर त्याला 3000 डॉलर म्हणजेच जवळपास 2,22,540 रुपये टीप दिली.
रविवारी रेस्टोरंट नाइट टाउनचे मालक ब्रेंडन रिंगने फेसबुकद्वारे याबाबत माहिती देत सांगितलं की, एका व्यक्तीने रेस्टोरंटमध्ये बीयरची ऑर्डर दिली. बियर पिऊन झाल्यानंतर बील भरण्यावेळी त्याने आधी बीयरचे 7 डॉलर भरले.
पण, रेस्टोरंटमधून निघताना त्या व्यक्तीला समजलं की, कोरोनामुळे रेस्टोरंट अनिश्चित काळासाठी बंद होणार आहे. त्यावेळी त्याने सर्वांसाठी प्रार्थना केली आणि मालकाला टीप दिली. दिलेली टीप रेस्टोरंटमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांमध्येही वाटण्याचं त्याने सांगितलं.
त्या व्यक्तीने हॉटेल मालकाला, किती टीप दिली आहे हे सांगितलं नाही, पण ती सर्वांमध्ये वाटण्याचं सांगून तो निघून गेला. टीप किती आहे हे हॉटेल मालकालाही माहित नव्हतं. तो व्यक्ती गेल्यानंतर हॉटेल मालकाने पाहिलं त्यावेळी सर्वच जण इतकी मोठी दिलेली टीप पाहून हैराण झाले. हॉटेल मालकाने फेसबुकवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहिलं नाही. पण त्याच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांनीच त्या व्यक्तीचे मनापासून आभार मानले आहेत. त्या व्यक्तीच्या या कृतीने त्याचं सर्वत्र कौतुक होतंय
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.