प्रेम जिंकलं! व्हिलचेअरवर नवरदेव अन् त्याच्यामागे नवरी; असा पार पडला अनोखा विवाह सोहळा
13 मार्च 2016 मध्ये झालेल्या अपघातात राहुलचा अपघात झाला आणि शरीराच्या खालचा भाग लकवाग्रस्त झाला. त्यादरम्यानही अनामिकाने त्याला साथ दिली. दिव्यांगावर मात करत प्रेमच वरचढ ठरलं आहे.


सोमवारी 29 वर्षीय राहुल सिंह दिवाकर आणि अनामिका यांचं लग्न झालं. आता यात मोठं काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण खास बाब म्हणजे दिव्यांगावर मात करत प्रेमच वरचढ ठरलं आहे. राहुलचा 2016 मध्ये एक अपघात झाला. त्या अपघातात त्याच्या शरीराच्या खालचा भाग लकवाग्रस्त झाला. तेव्हापासून तो व्हिलचेयरवर आहे.


अनामिकाने हे सर्व मागे टाकत राहुलशी लग्न केलं. चंडीगढमध्ये राहणारे हे दोघे एकमेकांचे शेजारी होते. 2008 पासून ते रिलेशनशिपमध्ये होते.


पण 13 मार्च 2016 मध्ये राहुलचा अपघात झाला आणि शरीराच्या खालचा भाग लकवाग्रस्त झाला. त्यादरम्यानही अनामिकाने त्याला साथ दिली. अनामिका तेव्हापासून नेहमी मला प्रोत्साहन देत असल्याचं राहुलने सांगितलं.


राहुलचे वडील सेनेत आहेत. त्याची आई आणि बहीण शिक्षक आहेत. राहुलच्या वडीलांची 2018 मध्ये बदली झाली आणि ते लखनऊला गेले. काही दिवसांनंतर अनामिका त्याच्या घरी गेली आणि तिने लग्नाबाबत विचारलं.