मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'हे सलून आहे की....' सलूनच्या HOT PHOTO ने मोठी खळबळ

'हे सलून आहे की....' सलूनच्या HOT PHOTO ने मोठी खळबळ

जाहिरातीमध्ये एक एक हॉट तरुणी, खुर्चीत बसलेल्या एका पुरुषासोबत दिसते आहे. ज्या अंदाजात त्या दोघांनी पोज दिली आहे, त्यावरुन ही जाहीरात कसली आहे असा प्रश्नचं लोकांना पडला आहे.

जाहिरातीमध्ये एक एक हॉट तरुणी, खुर्चीत बसलेल्या एका पुरुषासोबत दिसते आहे. ज्या अंदाजात त्या दोघांनी पोज दिली आहे, त्यावरुन ही जाहीरात कसली आहे असा प्रश्नचं लोकांना पडला आहे.

जाहिरातीमध्ये एक एक हॉट तरुणी, खुर्चीत बसलेल्या एका पुरुषासोबत दिसते आहे. ज्या अंदाजात त्या दोघांनी पोज दिली आहे, त्यावरुन ही जाहीरात कसली आहे असा प्रश्नचं लोकांना पडला आहे.

  नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : जगभरात कोणत्याही वस्तूची, प्रोडक्टची, एखाद्या ठिकाणाची किंवा दुकानाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जाहीरात केली जाते. या जाहिराती (Advertisement) लोकांना वस्तू नेमकी काय आहे, कशासाठी आहे याची माहिती करुन देण्यासाठी त्यादृष्टीने केली जाते. पण आता एक अशी जाहीरात समोर आली आहे, ज्यात नेमकी ही कोणती जाहीरात आणि ती कशासाठी केली आहे याचा अर्थच लागत नाही. सोशल मीडियावर ही जाहीरात व्हायरल झाली असून अनेकांनी जाहिरातीचा वेगळाच अर्थ काढला आहे. ही विचित्र जाहीरात थायलँडमधील (Thailand) असून जाहिरातीमुळे लोकांमध्ये मोठा गैरसमज, गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे. या जाहिरातीमध्ये एक एक हॉट तरुणी, खुर्चीत बसलेल्या एका पुरुषासोबत दिसते आहे. ज्या अंदाजात त्या दोघांनी पोज दिली आहे, त्यावरुन ही जाहीरात नेमकी कसली आहे असा प्रश्नचं लोकांना पडला आहे. थायलँडच्या नाखोन सावन सिटीमध्ये रियल कट 4 नावाचं एक सलून आहे. त्यांनी आपल्या जाहिरातीचे काही फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कमी कपडे घातलेली तरुणी एका पुरुषासोबत दिसते आहे. हे फोटो सलूनच्या जाहिरातीसाठी डिझाइन करण्यात आले, पण ही जाहिरात पाहून लोकांनी काही वेगळाच अर्थ काढला आहे. ही सलूनची जाहीरात वाटत नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

  हे वाचा - LIVE न्यूज रिपोर्टिंग करताना दोन पुरुषांचा KISS झाला टेलिकास्ट, VIDEOमुळे खळबळ

  सोशल मीडियावर या विचित्र जाहिरातीचे फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी ही जाहीरात मसाज पार्लरची असल्याचं म्हटलंय, तर अनेकांनी काही वेगळाच अर्थ लावला आहे. या जाहिरातीमुळे इतका बवाल झाला, की सलूनच्या मालकाला यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. रियल कट या सलूनच्या फेसबुक पेजवर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

  हे वाचा - पत्नीची विचित्र अटीला वैतागला पती; व्यथा ऐकून तुम्हीही म्हणाल, 'आपली बायको बरी'

  केवळ प्रमोशनल फोटोशूट - फेसबुक पोस्टमध्ये दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, आमच्या पेजवरील जाहिराती पाहिल्यानंतर अनेकांनी कॉल करत चौकशी केली. आम्ही नेमकी कोणती सर्विस देतो याबाबत मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. हे केवळ एक प्रमोशनल फोटोशूट होतं. आमच्याकडे एक महिला आणि दोन पुरुष बार्बर आहेत. फोटोमध्ये दिसणारे सलूनचे मालक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Photo viral

  पुढील बातम्या