मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सिंगापूरमध्ये दोन पुरुषांचा KISS झाला LIVE टेलिकास्ट, संपूर्ण देशात उडाला गोंधळ

सिंगापूरमध्ये दोन पुरुषांचा KISS झाला LIVE टेलिकास्ट, संपूर्ण देशात उडाला गोंधळ

Photo: Screen gram youtube Channel_HomosexualityinSingapore

Photo: Screen gram youtube Channel_HomosexualityinSingapore

विंटर ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा सिंगापूरमध्ये लाईव्ह दाखवण्यात आला. या सोहळ्यात उत्साही चाहत्यांनी खचाखच भरलेलं स्टेडियम दाखवलं गेलं. यामध्ये दोन पुरुष एकमेकांना किस करताना (Gay kiss) लाईव्ह दाखवले गेले.

सिंगापूर, 9 फेब्रुवारी : चीनची राजधानी बीजिंग (Beijing) येथील नॅशनल स्टेडियममध्ये 4 फेब्रुवारीपासून विंटर ऑलिम्पिकला (Winter Olympics) सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यातील लाईव्ह रिपोर्टिंगच्या क्लिपनं सिंगापूरमध्ये (Singapore) खळबळ उडाली आहे. दोन पुरुष एकमेकांना किस करतानाची ही व्हिडीओ क्लिप असून सिंगापूरच्या एका वृत्तवाहिनीनं ही क्लिप प्रसारित केली आहे. सिंगापूरमधील चॅनल न्यूज एशियावर (Channel News Asia) ही क्लिप प्रसारित झाली आहे. विशेष म्हणजे सिंगापूरमधील ब्रॉडकास्ट कोडमध्ये एलजीबीटी (LGBT) 'लाईफस्टाईल'चा प्रचार करणार्‍या गोष्टी प्रसारित करण्यास बंदी आहे. याशिवाय तिथे पुरुषांमधील लैंगिक संबंधदेखील बेकायदेशीर आहेत.

बीजिंग बार येथील (Beijing bar) विंटर ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा सिंगापूरमध्ये लाईव्ह दाखवण्यात आला. या सोहळ्यात उत्साही चाहत्यांनी खचाखच भरलेलं स्टेडियम दाखवलं गेलं. यामध्ये दोन पुरुष एकमेकांना किस करताना (Gay kiss) लाईव्ह दाखवले गेले. त्यामुळे सिंगापूरमध्ये खळबळ उडाली.

ट‍िकटॉकवर 8.25 लाख लोकांनी पाहिली ही व्हिडीओ क्‍ल‍िप

चॅनल न्यूज एशियानं (CNA) त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या बातमीमध्ये गे किसची क्लिप जोडण्यात आलेली नाही. मात्र, टिकटॉकवर (TikTok) ही किसची क्लिप उपलब्ध असून आतापर्यंत आठ लाख 25 हजार पेक्षा जास्त वेळा ती पाहिली गेली आहे. ही खरोखर क्रांतीकारी कृती आहे, असं सांगत एका युजरनं या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. या युजरनं असंही म्हटलं आहे की, चीनमधील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वरदेखील ही क्लिप मोठ्या प्रमाणात शेअर केली गेली आहे.

वाचा : Valentine's Day ला 'या' मॉडेलसोबत डेटला जाण्यासाठी लागली 45 लाखांची बोली

भेदभावाबाबत जागरूकता निर्माण करत आहेत विद्यार्थी

यावर नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, कॅलिडोस्कोपमधील (Nanyang Technological University) प्रतिनिधीनं सांगितलं की, किस घेण्यास तयार असलेल्या पुरुषांपैकी एकाचा लूक कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्यानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आमच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीसुद्धा (Students) एक गट तयार केला आहे ज्यामध्ये लैंगिक प्रवृत्ती, लिंग, जात आणि वर्गाच्या आधारावर भेदभाव करण्याबाबत जनजागृती (Awareness) करण्याचं काम केलं जातं.

चीननं 1997मध्ये समलैंगिक संबंधांना गुन्ह्यांच्या यादीतून वगळलं

विद्यापीठ प्रतिनिधीनं सांगिल्यानुसार, क्लिपमधील व्यक्ती कोण आहे? चुंबन घेताना सीएनएचा कॅमेरा आपल्याला कॅप्चर करत आहे, या गोष्टींची त्याला कल्पना होती की नाही याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. ही घटना चीनमध्ये घडलेली आहे. चीननं 1997 मध्येच समलैंगिक संबंधांना गुन्ह्यांच्या यादीतून वगळलं होतं. परंतु, असं असलं तरीही समलिंगी विवाह तिथे कायदेशीर नाही आणि LGBTQ+ समुदाय भेदभाव आणि सेन्सॉरशिपचा सामना करत आहे.

वाचा : पत्नीची विचित्र अटीला वैतागला पती; व्यथा ऐकून तुम्हीही म्हणाल, 'आपली बायको बरी'

एलजीबीटी (LGBT) नागरिकांना स्वीकारण्यास सिंगापूर मागास

एलजीबीटी अधिकार संस्था 'सयोनी'चे सह-संस्थापक जीन चोंग म्हणाले की, सिंगापूर हा विकसित देश मानला जातो. परंतु एलजीबीटी अधिकारांच्या (LGBT rights) बाबतीत आम्ही खरोखरच मागासलेले आहोत. सिंगापूरमधील कायदे किती मागास आहेत, हे या क्लिपच्या प्रकरणातून लक्षात येतं.

अथॉरिटीच्या या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणं बंधनकारक

फ्री-टू-एअर (Free to Air) आणि सब्सक्रिप्शन टेलीव्हिजनसाठी सिंगापूरमधील इन्फोकॉम मीडिया डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (Infocomm Media Development Authority) मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आलं आहे की, 'पर्यायी लैंगिकता, समलैंगिकता (Homosexuality) या सर्व गोष्टी दाखवणारे चित्रपट संवेदनशील कॅटेगरीमध्ये असणं आवश्यक आहे. समलैंगिकतेला जास्त प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटांवर बंदीसुद्धा घातली जाऊ शकते, असं या सूचनांमध्ये सांगण्यात आलेलं आहे.

असे नियम असलेल्या सिंगापूरमध्ये दोन पुरुषांचा किस करतानाचा व्हिडीओ लाईव्ह प्रसारित झाल्यामुळं खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Olympic, Singapore, Video viral