लंडन, 08 फेब्रुवारी : लग्न झालं की बहुतेक पुरुषांना आपण आता बायकोच्या तावडीत अडकलो, आता आपलं स्वातंत्र्य संपलं, आता आपण पत्नी पीडित आहोत असंच वाटतं. पण नुकतंच एका व्यक्तीने आपली अशी व्यथा मांडली आहे (Strange condition of wife), जी ऐकल्यानंतर तुम्ही बायकोच्या बाबतीत स्वतःला नशीबवान समजाल. या व्यक्तीच्या बायकोने इतकी विचित्र अट ठेवली आहे, की तुम्हाला त्यापेक्षा तुमची बायको बरी वाटेल. यूकेतील 37 वर्षांची ही व्यक्ती आपल्या 34 वर्षांच्या पत्नीच्या विचित्र अटीमुळे वैतागला आहे. त्याची बायको इतकी कंजूस आहे की तिने कंजूसपणात हद्दच पार केली आहे. तिने अशा ठिकाणी कंजूसपणा केला आहे, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. तुम्हाला फक्त वाचूनच धक्का बसेल की या व्यक्तीला त्याच्या पत्नीने तिच्यासोबत एका वर्षात फक्त 3 वेळाच शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी दिली आहे. झी न्यूज ने द सनच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीने सांगितलं की, त्यांच्या लग्नाला 7 वर्षे झाली. त्यांना 6 वर्षांची एक मुलगीसुद्धा आहे. पण दोघांमध्ये सर्वकाही ठिक नाही. त्याची बायको मुडी आहे. जेव्हा लैंगिक संबंधाबाबत तो तिच्याशी बोलतो तेव्हा तिला राग येतो. हे वाचा - पतीने माझ्या बहिणीला पळवलं त्यांना…; जिल्हाधिकाऱ्यांकडे महिलेची कळकळीची विनंती त्याची बायको त्याला वर्षातून फक्त तीनदाच तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला देते. त्याचा बर्थडे, लग्नाचा वाढदिवस आणि एक दिवस वर्षातील कोणताही. बायको प्रेमात इतका कंजूसपणा का करते, हे त्यालाही समजत नाही. या वर्षात त्याने आपल्या बायकोसोबत एक वेळा संबंध ठेवला आहे. आता त्याच्याकडे वर्षातील फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत. आता माझ्या बायकोशी जास्त बोलत नाही. घरातील काही सामान आणायचं असेल किंवा मुलीसंबंधी काही असेल तरच आम्ही बोलतो. बायकोसोबत संबंध तोडायचे नाहीत. आपली मुलगी सिंगल पॅरेंटसोबत मोठी व्हावी असं बिलकुल वाटत नाही, असंही या व्यक्तीने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.