टोरंटो, 21 जुलै : हायवेवर होणारे अपघात लक्षात घेता परदेशात टेसला (Tesla) या प्रसिद्ध कंपनीने ऑटोपायलट गाड्या बाजारात आणल्या आहेत. ऑटोपायलट गाड्यांच्या मदतीने जेव्हा गाड्या भरधाव वेगाने धावत असतात, तेव्हा गाडी ऑटो कंट्रोल होते. टेस्लाच्या या गाड्या ऑटोपायलट या खास फिसर्चसाठी घेतल्या जातात. मात्र पहिल्यांदाच या फिचरमुळे एका प्राण्याचे जीव वाचला आहे. एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये टेसला मॉडेल 3चा मालक हायवेवर रात्री गाडी चालवत असताना, अचानक त्याच्या समोर हरिण आलं. गाडीचा वेग प्रचंड असल्यामुळे ब्रेक लावला असता तरी हरिण गाडीखाली आले असते, मात्र ऑटोपायलटमुळे गाडी आपोआप बाजूला गेली. हा व्हिडीओ कॅनडामधला आहे. वाचा- मुसळधार पावसामुळे अचानक फळ बाजारावर कोसळली दरड, थरारक LIVE VIDEO
Thanks @elonmusk and the @Tesla team. #Autopilot just saved me from having a very bad day! #TeslasAreAwesome #AutopilotForTheWin@TeslaOwnersSK pic.twitter.com/jHjZbjl4Cr
— Russ Lepage (@russlepage) June 18, 2020
वाचा- आकाशातील मनमोहक रंगामध्ये विजांचा कडकडाट, VIDEO पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल व्हायरल व्हिडीओमध्ये अचानक गाडीसमोर हरिण आल्यानंतर एक क्षणात गाडी बाजूला जाताना दिसत आहे. गाडीच्या मालकाने हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यानं यावर, टेसला गाडीचे आणि टेसलाचे मालक इलॉन मस्क यांचे आभार मानले. हा व्हिडीओ 19 जुन रोजी शेअर करण्यात आला असला तरी, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ टेसला मॉडेल 3मध्ये असलेल्या कॅमेऱ्यात शूट झाला आहे. याआधी टेसलाच्या ऑटोपायलट गाड्यांवर टीकाही करण्यात आली होती. कारण, अमेरिकेत ऑटोपायलट गाड्यांमुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्या ऐवजी वाढले होते. वाचा- ट्रॅफिक मामाने पकडताच तरुणाने भररस्त्यात काढले कपडे; VIDEO होतोय व्हायरल