मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ट्रॅफिक मामाने पकडताच तरुणाने भररस्त्यात काढले कपडे; त्याचा तो VIDEO होतोय व्हायरल

ट्रॅफिक मामाने पकडताच तरुणाने भररस्त्यात काढले कपडे; त्याचा तो VIDEO होतोय व्हायरल

ट्रॅफिक पोलिसाकडून सुटका करुन घेण्यासाठी लोक काय करतीय त्याचं काही सांगू शकत नाही

ट्रॅफिक पोलिसाकडून सुटका करुन घेण्यासाठी लोक काय करतीय त्याचं काही सांगू शकत नाही

ट्रॅफिक पोलिसाकडून सुटका करुन घेण्यासाठी लोक काय करतीय त्याचं काही सांगू शकत नाही

  • Published by:  Meenal Gangurde

भीलवाडा, 19 जुलै : ट्राफिक मामांनी पकडू नये म्हणून वाहन चालक नवनव्या क्लृप्त्या शोधून काढत असतात. अगदी ट्रकला ओव्हरटेक करण्यापासून ते गाडी भरधाव घेऊन जाण्यापर्यंत. त्यातही गाडी पकडलीच आणि आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट नसतील तर मात्र काही खैर नाही. अशावेळी नको नको त्या कारणांनी मामांना फसवण्याचा प्रयत्न सुरू असतो. अशातच एका पठ्याने तर भर रस्त्यात स्वत: चे कपडे काढण्यास सुरुवात केली. टेस्कटाइल सिटीच्या नावाने प्रसिद्ध राजस्थानातील भीलवाडामध्ये हेल्मेटशिवाय दुचाकीवर फिरणाऱ्या एका तरुणाला ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं. यानंतर तरुणाने जो काही ड्रामा केला त्यामुळे रस्त्यावरील लोकाचं मनोरंजनाबरोबर मनस्तापही झाला.

पोलिसांनी हेल्मेट घातलं नव्हतं म्हणून तरुणाला दंड केला. त्यानंतर अचानक तरुणाने कपडे काढण्यास सुरुवात केली. भीलवाडामध्ये फळं आणि भाजीचा व्यवसाय करणारा मेवाराम कुमावत आपली पत्नी आणि मुलांसह बाईकवरुन अजमेर तीननाक्याहून जात होता. या दरम्यान तेथे तैनात पोलिसांनी उप-निरीक्षक हरिशंकर यांनी मेवाराम यांना हेल्मेटशिवाय बाइक चालवत पाहत त्याला थांबवलं आणि दंड भरण्यास सांगितलं. त्यानंतर मेवाराम आपले कपडे काढू लागला.

" isDesktop="true" id="465448" >

त्याने पँट, शर्ट, बनियान काढली आणि रस्त्यावर गोंधळ घालू लागला. मेवाराम म्हणाला माझ्याकडे काही नाही. मीपण तुमच्यासारख्या पोलिसांना सहकार्य (कोऑपरेट) करतो. अनेक पोलीस माझ्याकडे येतात..मी त्यांना घरापर्यंत फळं पोहोचवतो.

First published:

Tags: Rajasthan