• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • आकाशातील मनमोहक रंगामध्ये विजांचा कडकडाट, VIDEO पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल

आकाशातील मनमोहक रंगामध्ये विजांचा कडकडाट, VIDEO पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल

सध्या सोशल मीडियावर कडाडणाऱ्या विजांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नक्कीच तुमच्या डोळ्याचे पारणे फिटेल

 • Share this:
  यूएस, 20 जुलै : पावसाळ्याच्या दिवसात आकाशात चमकणारी वीज घराच्या अंगणातून किवा गॅलरीतून बघण्याची सवय आणि आवड अनेकांना असते. मात्र या कडाणाऱ्या विजा पाहून अनेकांना भीती देखील वाटते. सध्या सोशल मीडियावर असाच एक विजांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नक्कीच तुमच्या डोळ्याचे पारणे फिटेल. Reuters वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका व्यक्तीने विजांचा कडाडताना टाइमलॅप्समध्ये कैद केल्या आहेत. यावेळी अवकाशात विविध रंगांच्या छटा देखील पाहायला मिळतात. म्हणजे एखाद्या चित्रपटात स्पेशल इफेक्टचा वापर केलेला असतो, तसे रंग ही वीज चमकल्यानंतर अवकाशात दिसत आहेत. (हे वाचा-एका क्षणात नाल्यात वाहून गेली घरं, दिल्लीतील पावसाचा हाहाकार दाखवणारा VIDEO) अमेरिकेतील Kentucky मध्ये हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. 1 लाखापेक्षा अधिक ट्विटर युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे. दरम्यान इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की अवकाशात वीज कशी चमकत आहे आणि वेगाने ढग बदलताना दिसत आहेत. दरम्यान या टाइमलॅप्सवर आलेल्या काही प्रतिक्रिया देखील भन्नाट आहेत. एका युजरने म्हटले आहे की, असं वाटतंय साक्षात देव येत आहे. तर काही युजर्सनी असे पोस्ट केले आहे की मुळचा हा व्हिडीओ Michael Siebold या इसमाने शूट केला आहे. त्याने पोस्ट केलेला व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे आणि अनेकांनी तो लाइक देखील केला आहे. Reuters वृत्तसंस्थेने या व्हिडीओला 'Dramatic' म्हटले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तशीच काहीशी प्रचिती येत आहे. (हे वाचा-लय भारी! ऊस उत्पादनात तयार होणाऱ्या कचऱ्यापासून बनवणार 'बायोमास्क') संपादन - जान्हवी भाटकर
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: