वाचा-मोडून पडला संसार...! आसाममध्ये पुराचा हाहाकार, मन हेलावून टाकणारे PHOTO दुसरीकडे हवामान विभागाने या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हिमाचलच्या अनेक जिल्ह्यात 21 जुलैपर्यंत यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीचा इशारा पाहता हिमाचल सरकारने राज्यात अलर्ट जारी केला आहे. सर्व जिल्ह्यातील डीसींना पावसाळ्यामुळे होणार्याय आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाचा-बिचारा रिपोर्टर! मास्क न घालता प्रश्न विचारायला गेला, उत्तरात मिळाला ‘कोरोना’ 21 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट हिमाचलसाठी येणारा आठवडा मुसळधार पावसाचा असणार आहे. 20 आणि 21 जुलैला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. किन्नौर आणि लाहौल स्पीटी वगळता संपूर्ण राज्यात म्हणजेच दहा जिल्ह्यात मुसळधार पाऊस व वादळाचा इशारा देण्यात आला आहे. 23 जुलैपर्यंत राज्यातील हवामान खराब असेल. नदी नाल्यांमधील पाण्याची पातळी आणखी वाढू शकते. याव्यतिरिक्त, भूस्खलन आणि झालं पडण्याच्या घटना घडू शकता. त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाचा-‘डॉक्टर माझी बायको रोज...’, रुग्णालयात फोन करून पतीने केली पत्नीची अजब तक्रार#WATCH Himachal Pradesh: Landslide in Bhattakufer area near Shimla, following heavy rainfall. pic.twitter.com/pQIlW9Qlcl
— ANI (@ANI) July 20, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.