• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • नशेत गाडी चालवत होता तरुण, अचानक लागली झोप अन्...; पाहा Shocking Video

नशेत गाडी चालवत होता तरुण, अचानक लागली झोप अन्...; पाहा Shocking Video

ज्या गाडीच्या ऑटोपायलट मोडला अत्यंत धोकादायक समजलं जातं, त्याच मोडमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. या ऑटोपायलट मोडमुळे दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीचा जीव थोडक्यात वाचला.

 • Share this:
  नवी दिल्ली 03 ऑगस्ट : स्वतः चालणारी गाडी टेस्ला (Tesla) अनेकदा टीकेची धनी झाली आणि आणि त्याच्या ऑटोपायलट मोडबाबतही (Autopilot mode) अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. मात्र, सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ (Viral Video) पाहता टेस्लाच्या ऑटोपायलट मोडबाबत आता लोकांचं मत बदलत असल्याचं दिसत आहे. ज्या गाडीच्या ऑटोपायलट मोडला अत्यंत धोकादायक समजलं जातं, त्याच मोडमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. या ऑटोपायलट मोडमुळे दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीचा जीव थोडक्यात वाचला आहे. BREAKING : पठाणकोटमध्ये भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती नशेमध्ये धुंद होऊन टेस्ला कार चालवत होता. इतक्यात नशेतच गाडी चालवत असतानाच त्याचा डोळा लागला. मात्र, नॉर्वेमध्ये राहणाऱ्या या 24 वर्षीय व्यक्तीचा जीव वाचला, कारण त्याला झोप लागताच टेस्लाचा ऑटोपायलट मोड अॅक्टिव्ह झाला आणि गाडी स्वतःच चालू लागली. या ऑटोपायलट मोडमुळे मोठी दुर्घटना टळली आणि तरुणाचा जीव वाचला. असं म्हटलं जात आहे, की हा मुलगा टेस्लाची मॉडल एस (Tesla model S) कार चालवत होता. भारतीयांना जाणून घ्यायची आहे सिंधूची जात, Google वर शोधलं जातंय ‘PV Sindhu Cast' गाडी ऑटोपायलट मोडमध्ये जाऊन चालत राहिल्यानं इतर गाड्यांना धडकली नाही आणि एक मोठी दुर्घटना टळली. टेस्लाचा ऑटो पायलट मोड तेव्हाच अॅक्टिव्ह होतो जेव्हा ड्रायव्हिंग सीटवर ड्रायव्हरचा रिस्पॉन्स मिळतो. या घटनेत ड्रायव्हरला झोप लागल्यानंतर बराच वेळ काहीच रिस्पॉन्स न मिळाल्यानं कार स्वतः थांबली आणि हजार्ड लाइट्सही ऑन झाल्या. या घटनेचा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण टेस्लाचं कौतुक करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: