मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

खेळापेक्षा भारतीयांना खेळाडूंच्या जातीमध्ये मोठा रस, Google वर शोधलं जातंय ‘PV Sindhu Caste'

खेळापेक्षा भारतीयांना खेळाडूंच्या जातीमध्ये मोठा रस, Google वर शोधलं जातंय ‘PV Sindhu Caste'

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने कांस्यपदक मिळवले (PV Sindhu bags Bronze) असले, तरी कित्येक देशवासीयांनी तिला ट्रोल (PV Sindhu trolled) करण्यास सुरुवात केली होती. एवढंच नव्हे तिची जात शोधण्यातंही भारतीय पुढे आहेत

पुढे वाचा ...

मुंबई, 03 ऑगस्ट: टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने कांस्यपदक मिळवले (PV Sindhu bags Bronze) असले, तरी कित्येक देशवासीयांनी तिला ट्रोल (PV Sindhu trolled) करण्यास सुरुवात केली होती. सिंधूने आता निवृत्त झालं पाहिजे, नवीन चेहऱ्यांना संधी द्या, अशा आशयाचे ट्वीट्स आणि सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. ज्या दिवशी तिने पदक जिंकलं, त्याचदिवशी या पोस्ट सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत्या. यासोबतच आणखी एक गोष्ट इंटरनेटवर ट्रेंडिंग होती, ती म्हणजे सिंधूची जात! (PV Sindhu Caste) सिंधूच्या खेळाबाबत, तिच्या आयुष्याबाबत, तिच्या करिअरबाबत सर्च करण्यापेक्षा लोकांना तिच्या जातीबाबत सर्च केले आहे.

गुगल सर्च इंजिनमध्ये कोणते शब्द (Keywords) शोधले जात आहेत, किंवा ट्रेंडिंग आहेत याची माहिती ट्रेंड्स डॉट गुगल डॉट कॉमवर (trends.google.com) मिळते. एक ऑगस्टला ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर सर्वात जास्त सर्च केला गेलेला की वर्ड होता – पीव्ही सिंधू कास्ट. सिंधूची जात जाणून घेण्यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातचे लोक पुढे होते. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिलं आहे.

हे वाचा-विराटने सांगितला इंग्लंडमध्ये जिंकण्याचा मंत्र, भारतीय खेळाडूंना दिला मेसेज

गुगल ट्रेंड्सवर असलेल्या आलेखानुसार, 2016च्या ऑगस्टमध्ये पहिल्यांदा PV Sindhu Caste हा कीवर्ड वापरण्यात आला. 20 ऑगस्ट 2016 रोजी सिंधूने रिओ समर ऑलिम्पिकमध्ये रौप्य (Rio Summer Olympic PV Sindhu) पदक मिळवलं होतं. यानंतर पुढे मग थोड्याफार प्रमाणात सिंधूची जात शोधण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र, यामध्ये 1 ऑगस्ट 2021ला 90 टक्के वाढ दिसून आली. यात मग ‘पीव्ही सिंधू कास्ट’ सोबतच, पुसरला कास्ट (Pusarala Caste), पुसरला सरनेम कास्ट (Pusarala surname caste) हे सर्च देखील ट्रेंडिंग होते. पी. व्ही. सिंधूचं पूर्ण नाव पुसरला वेंकट सिंधू आहे. म्हणजेच, काहीही करुन लोकांना तिची जात माहिती करुन घ्यायची होती.

यावर बोलताना सामाजिक कार्यकर्ते दिलीप मंडल म्हणाले, ‘खेळाडूंची जात शोधणारे हे लोक गुगल वापरु शकतात, इंग्रजी टाईप करू शकतात, यांच्याकडे मोबाईल-लॅपटॉप आणि इंटरनेट आहे. म्हणजेच हे लोक सुशिक्षित आहेत. या वरून हेच दिसतं की जात ही काही मागच्या जमान्यातली गोष्ट राहिलेली नाही आणि कितीही शहरीकरण झालं, लोक शिकले तरीही लोकांच्या मनातली जात अजून संपलेली नाही.’

हे वाचा-Olympic 2020 : भारतीय घोडेस्वाराची ऐतिहासिक कामगिरी, फवाद मिर्झा फायनलमध्ये

खेळाडूंची जात शोधली जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2010 साली कॉमन्वेल्थ गेम्समध्ये दीपिका कुमारी महतोने तिरंदाजीमध्ये गोल्ड मेडल (Deepika Kumari Mahato) जिंकलं होतं. सध्या ती जगातील टॉप रँकिंग आर्चर (World’s no. one archer) आहे. 2012 साली तिला अर्जुन पुरस्कार (Arjun Award) देण्यात आला होता. तेव्हापासूनच तिची जात गुगलवर शोधली जात आहे. तसेच कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik), राष्ट्रीय टीमचे प्रमुख बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद (Pulela Gopichand) यांचीही जात शोधण्याचे प्रमाण अधिक आहे. क्रिकेटर संजू सॅमसनची (Sanju Samson) जात शोधण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. गेल्या एका वर्षात सात वेळा संजू सॅमसन कास्ट हा कीवर्ड ट्रेंडिंग होता, असं गुगलच्या आकडेवारीत दिसून येतं.

First published:

Tags: Google, Olympics 2021