Home /News /viral /

हे काय भलतंच! नवरदेवानं एकाच मंडपात दोघींसोबत बांधली लग्नगाठ; भन्नाट आहे Love Story

हे काय भलतंच! नवरदेवानं एकाच मंडपात दोघींसोबत बांधली लग्नगाठ; भन्नाट आहे Love Story

एकाच मंडपात नवरदेवानं दोन मुलींसोबत लग्नागाठ बांधली (Man Married 2 Women at the Same Ceremony) आहे. चार वर्ष हा तरुण दोघींनाही डेट करत होता.

    हैदराबाद 20 जून : बहुतेकदा तुम्ही मुलगा-मुलगी, दोन मुली किंवा दोन मुलांना लग्न (Marriage) करताना पाहिलं असेल. मात्र, असं तुम्ही कदाचितच पाहिलं किंवा ऐकलं असेल की एकाच मंडपात नवरदेवानं दोन मुलींसोबत लग्नागाठ बांधली (Man Married 2 Women at the Same Ceremony) आहे. मात्र, असं घडलं आहे. या घटनेत तरुणानं एकाच मंडपात दोन मुलींसोबत लग्नगाठ बांधली आहे. विशेष बाब म्हणजे, या लग्नसमारंभात अतिशय आनंदाचं वातावरण होतं आणि लोक नवरदेवासोबतच दोन्ही नवरीबाईंनाही आशिर्वाद देत होते. हे प्रकरण आहे तेलंगणाच्या उत्नूर जिल्ह्यातील घनपूर गावातलं. या गावातील अर्जुन नावाच्या एका तरुणाचं दोन मुलींवर प्रेम जडलं. त्यानं चार वर्ष दोघींनाही डेट केलं, यानंतर त्यानं दोघींसोबतही लग्न करण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीसाठी त्याच्या दोन्ही प्रेयसीदेखील तयार झाल्या. स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे, की आदिवासी समाजात एकसोबतच दोन महिलांसोबत लग्नगाठ बांधणं ही फार विशेष किंवा वेगळी बाब नाही. VIDEO: एकटेपाण दूर करण्यासाठी सिंगल तरुणानं अवलंबला भलताच पर्याय; लोक म्हणाले... हे अनोख लग्न 14 जून रोजी उत्नूर अंचलच्या घनपूर गावात झालं. या आगळ्यावेगळ्या लग्नानं लोकांचं लक्ष वेधून घेतलं. हे लग्न पाहण्यासाठी संपूर्ण गावातील लोक जमा झाले. व्ही अर्जुन बीएडची डिग्री घेतल्यानंतर आता स्पर्धा परिक्षांची तयारी करत होता. आतापर्यंत त्याला नोकरी मिळालेली नाही. मात्र, याच दरम्यान त्याचं उषाराणी आणि सुरेखा या दोन तरुणींवर प्रेम जडलं. तो दोन्ही तरुणींना चार वर्षापासून डेट करत होता. हैराण करणारी बाब म्हणजे, या दोघींना याची भनकही नव्हती की अर्जुन एकसोबतच या दोघींनाही डेट करत आहे. ‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच अर्जुनच्या आई-वडिलांनी त्याचं लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ही बाब समोर आली. त्याला आपल्या दोन्ही प्रेयसींमधील एकीलाही सोडायचं नव्हतं, त्यामुळे त्यानं दोघींनाही लग्नासाठी मनवलं. ही गोष्ट अर्जुनच्या घरच्यांनाही माहिती नव्हती. दोन्ही तरुणीही त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार होत्या. आदिवासी समाजाच्या एका सदस्यानं सांगितलं, की या दोन्ही मुलींना हे लग्न मान्य होतं आणि त्याच्या घरच्यांनाही काहीही अडचण नव्हती, त्यामुळे आम्हीदेखील हे लग्न होऊ दिलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Marriage, Viral news

    पुढील बातम्या