जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सिंगल तरुणानं अवलंबला भलताच पर्याय; Video पाहून लोक म्हणाले, एकटेपणा दूर करण्याचा उत्तम मार्ग

सिंगल तरुणानं अवलंबला भलताच पर्याय; Video पाहून लोक म्हणाले, एकटेपणा दूर करण्याचा उत्तम मार्ग

सिंगल तरुणानं अवलंबला भलताच पर्याय; Video पाहून लोक म्हणाले, एकटेपणा दूर करण्याचा उत्तम मार्ग

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Funny Video Viral) झाला असून हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओतून सिंगल (Single)लोकांनी आपला एकटेपणा कसा दूर करावा, यासाठी मजेशीर पर्याय सांगितला गेला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 20 जून : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ असे असतात, जे पाहून तुमच्या डोळ्यातही अश्रू येतात. तर, काही व्हिडिओ असे असतात, जे पाहून हसू आवरणंही कठीण होतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Funny Video Viral) झाला असून हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडिओतून सिंगल (Single)लोकांनी आपला एकटेपणा कसा दूर करावा, यासाठी मजेशीर पर्याय सांगितला गेला आहे. ‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; धम्माल VIDEO पाहाच सिंगल लोकांचीही आपलीच वेगळी दुःख असतात. सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडिओ असतात, जे एकटं राहाणाऱ्या लोकांचं दुःख सांगून जातात. तर, काही असे व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात, जे सिंगल लोकांना आपलं दुःख कमी करण्यासाठीचे साधे-सोपे पर्याय सांगतात. अशाच जुगाडचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

विश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या बेडवर एका हातात मुलींचा ड्रेस घालून झोपत असल्याचं पाहायला मिळतं. यानंतर तो हळूहळू स्वतःच्याच हातानं आपला गाल कुरवळत आहे, हे पाहून असं वाटतं, की एखादी मुलगीच त्याच्या गालावरुन हात फिरवत आहे. डोक्याखाली घेण्याच्या उशीलाच तो हा मुलांचा ड्रेस घालतो आणि याच्यासोबतच झोपी जातो. हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक केवळ हा व्हिडिओ शेअर करत नसून यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. मजेशीर पद्धतीनं आपलं एकटेपण दूर करण्याची पद्धत सांगणारा हा व्हिडिओ केवळ सिंगल लोकांसाठीच नाही, तर लॉकडाऊनमुळे आपल्या पार्टनरला भेटू न शकणाऱ्या लोकांसाठीही फायद्याचा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात