मराठी बातम्या /बातम्या /Viral /‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; बोबड्या बोलीचा धम्माल VIDEO पाहाच एकदा

‘मला लगीन करावं पाहिजे, नारळाच्या झाडासारखी बायको पाहिजे’; बोबड्या बोलीचा धम्माल VIDEO पाहाच एकदा

घरातल्यांनी गमतीने बनवलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल झालाय.

घरातल्यांनी गमतीने बनवलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल झालाय.

हा चिमुरडा.. ज्याला अजून नीट बोलताही येत नाही. तो बयकोसाठी हट्ट करतोय. आणि बायको का हवीय तर म्हणे.... तुम्हीच पाहा VIDEO

मुंबई,19 जून :लहान मुलं कधी कसला हट्ट (Children Demands) करतील याचा नेमच नाही. खेळणी, कपडे, आवडता खाऊ याचा हट्ट मुलांनी केला तर एकवेळ पालक देतीलही. पण, मुलाने बायकोसाठी (Wife) हट्ट केला तर, काय करावं बरं?

हा छोटासा मुलगा ज्याला अजून नीट बोलताही येत नाही तो बायकोसाठी हट्ट करतोय. अगदी हमसून हमसून रडत बाबांना सांगतोय की आजच बायको आणा. या मुलाची जेवणाची खूपच पंचाईत झाली आहे. आई आवडीचं जेवण देत नाही, त्यामुळे बायकोतरी जेवण बनवून देईल असं त्याला वाटतं. बरं त्याला बायको मोठी हवी, अगदी उंच नाराळाच्या झाडा एवढी मोठी पाहिजे. म्हणजे ती जेवण बनवेल अशी त्याची अट आहे.

" isDesktop="true" id="567361" >

घरातल्यांनी गमतीने बनवलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल झालाय. त्याच्या या बालीश हट्टाला काय म्हणावं? पण, लहान मुलीला जेवण येत नाही हे या चिमुकल्याला चांगलंच माहिती आहे बरं. म्हणूनच लग्नासाठी मोठी मुलगी हवी आहे.

पण दुसऱ्या बाजूला बायकोचं काम हे रांधणंच आहे या प्रकारची शिकवणच लहान मुलांना आपण देत असतो, हेही यातून अधोरेखित होतं. स्त्रियांना साचेबद्ध भूमिकेत बांधायचं काम अशा प्रकारे लहान मुलांच्या वाढीदरम्यानच होऊ लागलं, हा आरसाही दाखवणारा हा VIDEO आहे.

First published:
top videos

    Tags: Video Viral On Social Media, Videos viral