मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लाईव्ह बातम्या सांगतानाच अचानक पडला महिला अँकरचा दात अन्...; पाहा Shocking Video

लाईव्ह बातम्या सांगतानाच अचानक पडला महिला अँकरचा दात अन्...; पाहा Shocking Video

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की महिला अँकर लाईव्ह बातम्या वाचत असते. यादरम्यान तिच्यासोबत असं काही घडतं, ज्याचा विचारही तिने केला नसेल.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 13 डिसेंबर : लाईव्ह बातम्या सांगत असताना अनेकदा टीव्ही अँकरला (TV Anchor) अजब घटनांचा सामना करावा लागतो. मात्र, असं होऊनही हे अँकर न घाबरता परिस्थितीचा सामना करतात. सोशल मीडियावर सध्या एका अशाच महिला अँकरचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Female Anchor) होत आहे. यात या अँकरला अतिशय विचित्र स्थितीचा सामना करावा लागल्याचं पाहायला मिळतं (Anchor's Teeth Fall During Live Bulletin).

पहिल्यांदा डेटवर गेलेल्या तरुणीने सांगितला विचित्र अनुभव; युवकाने केलं अजब कृत्य

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की महिला अँकर लाईव्ह बातम्या वाचत असते. यादरम्यान तिच्यासोबत असं काही घडतं, ज्याचा विचारही तिने केला नसेल. मात्र यानंतरही ती बातम्या वाचणं थांबवत नाही. या परिस्थितीचा धैर्याने सामना करत ती आपलं काम व्यवस्थितपणे पार पाडते. हा व्हिडिओ यूक्रेनच्या न्यूज अँकरचा असल्याचं सांगितलं जात आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की यूक्रेनमधील एक न्यूज अँकर लाईव्ह शो करत आहे. तुम्ही पाहू शकता की ती बातम्या वाचत आहे. यादरम्यान अचानक तिचा दात तुटतो. मात्र अचानक घडलेल्या या घटनेनंतरही तिचं लक्ष विचलित होत नाही. या घटनेमुळे ती आपल्या कामात अडथळा येऊ देत नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अँकर न थांबता आपल्या हाताने तुटलेला दात बाहेर काढते आणि आपलं कर्तव्यही व्यवस्थितपणे पार पाडते. यादरम्यान ती काही सेकंदासाठी बातम्या देणं थांबवत नाही.

भर मैदानात खेळाडूनं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, VIDEO पाहून येईल डोळ्यांत पाणी

यूक्रेनची न्यूज अँकर Marichka हिने या घटनेचा व्हिडिओ स्वतःच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हि़डिओ कॅप्शन देत तिनं लिहिलं, मला अजिबातही असं वाटलं नव्हतं की न्यूज पाहणाऱ्या प्रेक्षकांचं या घटनेकडे लक्ष जाईल. अँकरने सांगितलं की जवळपास दहा वर्षांपूर्वी तिच्या मुलीने तिच्या दातावर एका लोखंडी घड्याळाने मारलं होतं. यामुळे तिचा दात तुटला होता. यामुळे तिला नकली दात लावावा लागला.

First published:

Tags: Live video viral, Shocking video viral