मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भर मैदानात खेळाडूनं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, VIDEO पाहून येईल डोळ्यांत पाणी

भर मैदानात खेळाडूनं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, VIDEO पाहून येईल डोळ्यांत पाणी

एका खेळाडूनं तिच्या गर्लफ्रेंडला अशा पद्धतीनं प्रपोज केलं, की पाहणारेदेखील भावूक झाले.

एका खेळाडूनं तिच्या गर्लफ्रेंडला अशा पद्धतीनं प्रपोज केलं, की पाहणारेदेखील भावूक झाले.

एका खेळाडूनं तिच्या गर्लफ्रेंडला अशा पद्धतीनं प्रपोज केलं, की पाहणारेदेखील भावूक झाले.

  • Published by:  desk news

सिडनी, 12 डिसेंबर: एका महिला खेळाडूनं (Female player) तिच्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) भर मैदानात लग्नाची मागणी (propose) घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral on social media) जोरदार व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांत प्रपोज करण्याच्या अनेक पद्धती (Ways to propose) प्रचलित आहेत. सोशल मीडियावर लग्नासाठी प्रपोज केल्याची अनेक उदाहरणं रोजच बघायला मिळत असतात. त्यातील काही प्रकार कल्पनेपलिकडील असतात. मात्र सध्या व्हायरल होणारं हे प्रपोजल आहे एका महिला खेळाडूचं. खेळ सुरू असतानाच तिनं आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज केलं आणि सर्वांनी एकच चित्कार केला.

जखमी झाल्याचं नाटक

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ऑस्ट्रेलियातील रिऊ नावाची सॉफ्टबॉल खेळाडू खेळ खेळत असल्याचं दिसतं. एका बॉलवर पाय घसरल्यामुळं खेळाडू जखमी झाल्याचं नाटक करते आणि जमिनीवर पडते. तिला खरोखरच काहीतरी दुखापत झाली असावी, असं समजून इतर खेळाडू तिच्या भोवती जमा होतात. मात्र ती वाट पाहत असते तिची गर्लफ्रेंड कोमांडेची. काही वेळातच कोमांडे तिच्याजवळ येते आणि जखमी असल्याचं नाटक करणारी रिऊ अचानक उठून आपल्या गुडघ्यावर बसते. गुडघ्यावर बसल्यानंतर ती आपल्या खिशातून एक अंगठी काढते आणि कोमांडेला प्रपोज करते. प्रपोज करण्याचा हा अनोखा प्रकार पाहून कोमांडे आनंदाने चित्कारू लागते आणि मैदानावरील इतर सर्वजण आनंदाने ओरडू लागतात.

अनोखी पद्धत

आपल्याला प्रपोज करण्याची एक वेगळी पद्धत हवी होती, अशी प्रतिक्रिया रिऊनं दिली आहे. सामान्य पद्धतीनं प्रपोज करण्याऐवजी आमचं पहिलं प्रेम असणारा खेळ खेळतानाच प्रपोज करण्याची कल्पना आपल्याला भावल्याचं तिनं म्हटलं आहे.

हे वाचा- Shocking! युवकाने एकाच दिवसात घेतले कोरोना लसीचे 10 डोस; वाचा पुढे काय झालं

लोक झाले इमोशनल

हा व्हिडिओ पाहणारे अनेकजण भावनिक झाले. ज्या प्रकारे रिउनं कोमांडेला प्रपोज केलं, ते पाहून डोळे पाणावल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. तर काहींनी समलैंगिक लग्नाला नाकंदेखील मुरडली आहेत. मात्र अशांचं प्रमाण फारच कमी आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याला 23 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

First published:

Tags: Girlfriend, Love story, Sport