Home /News /viral /

पहिल्यांदा डेटवर गेलेल्या तरुणीने सांगितला विचित्र अनुभव; कारमध्येच युवकाने केलं अजब कृत्य

पहिल्यांदा डेटवर गेलेल्या तरुणीने सांगितला विचित्र अनुभव; कारमध्येच युवकाने केलं अजब कृत्य

file photo

file photo

महिला ज्या व्यक्तीसोबत डेटवर गेली होती, त्याचे दात जेवण करत असताना अचानक बाहेर आले. इतकंच नाही तर माघारी येताना या तरुणाने कारमध्ये जे काही केलं ते आणखीच हैराण करणारं होतं.

    नवी दिल्ली 13 डिसेंबर : ब्लाईंड डेटिंगदरम्यान (Blind Dating) एका तरुणीसोबत अतिशय अजब घटना घडली. तरुण-तरुणीची ऑनलाईन ओळख झाली आणि यानंतर ते डेटिंगसाठी गेले मात्र यावेळी युवकाची अवस्था पाहून ती हैराण झाली. तरुणीने सोशल मीडियावर आपला हा डेटिंगबाबतचा अजब अनुभव (First Dating Experience) शेअर केला आहे. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार ती एका व्यक्तीसोबत डेटवर गेली. यादरम्यान जेवण करत असताना या तरुणाचे दात अचानक बाहेर आले. 14 महिन्यांच्या बाळानं पहिल्यांदाच पाहिला कुत्रा, सगळे म्हणाले SO SWEET अमेरिकेच्या इंडियानामध्ये राहणाऱ्या एमीजने टिकटॉकवर एक व्हिडिओ (Tiktok Video) शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तिने सांगितलं की ती एका अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली मात्र तिचा अनुभव हैराण करणारा होता. महिला ज्या व्यक्तीसोबत डेटवर गेली होती, त्याचे दात जेवण करत असताना अचानक बाहेर आले. इतकंच नाही तर माघारी येताना या तरुणाने कारमध्ये जे काही केलं ते आणखीच हैराण करणारं होतं. या घटनेनंतर तरुणी पुन्हा कधीच त्याला भेटली नाही. एमीजने सांगितल्यानुसार, तिची या तरुणासोबत टिंडरवर ओळख झाली होती. बोलणं सुरू होताच या व्यक्तीने तिला डेटवर आपल्यासोबत जाण्यासाठी विचारलं. एमीज तयार झाली. यानंतर हा व्यक्ती म्हणाला की माझी गाडी खराब झाली आहे, त्यामुळे तू मला घेण्यासाठी ये. यामुळे एमीज स्वतःच तयार होऊन त्याच्याकडे गेली. या नादात त्यांना भरपूर उशीर झाला आणि त्यांनी बुक केलेला डिनर मिस झाला. यानंतर अचानक या व्यक्तीने म्हटलं की मला घरातील काही गरजेच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. एमीजची कार वापरूनच त्याने शॉपिंग केली. आईला आपल्याच मुलाची वाटते घृणा, कारण वाचून कुणालाही येईल दया शॉपिंगनंतर एमीज त्याच्यासोबत डिनर करण्यासाठी गेली. डिनर करत असताना अचानक या व्यक्तीचे दात बाहेर आले. हे पाहताच एमीजला धक्का बसला. तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. यानंतर लगेचच एमीजने माघारी जाण्याचा निर्णय घेतला. दोघंही जेव्हा घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा या तरुणाचं पोट खराब झालं आणि त्यानं गाडीमध्येच दुर्गंध पसरवण्यास सुरुवात केली. अखेर तिने या व्यक्तीला त्याच्या घरी सोडलं आणि पुन्हा कधीच त्याला भेटली नाही. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Love story, Online dating

    पुढील बातम्या